अरविंद शर्मा/भोपाळ, 04 जून : आतापर्यंत चोरी च्या बऱ्याच घटना तुम्हाला माहिती असतील. किती तरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या चोरीचा असा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चोर चक्क 15 रुपयांच्या गाडीतून आले आणि त्यांनी 150 रुपयांचं मीठ चोरी करून पळवलं आहे. मध्य प्रदेशमधील ही अजब चोरी. भिंडमध्ये व्हीआयपी चोरांचा असा प्रताप पाहायला मिळाला. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता आलिशान गाडी दिसते आहे. या गाडीजवळ काही तरुण आहे, जे आपसात बोलत आहेत. एक तरुण बोलता बोलता रस्त्याच्या कडेला असलेल्या पोती उचलताना दिसतो उचलतो आहे. पोती उचलून तो आलिशान गाडीत टाकतो आहे. एकएक करत त्याने तीन पोती गाडीत टाकल्या आणि गाडीची डिक्की बंद केली. या पोती दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नाहीतर तर मिठाच्या गोण्या आहेत. VIDEO - बर्थडे आहे चोराचा! पोलिसांनीही केलं हटके विश; दिलं जबरदस्त ‘गिफ्ट’ या पोत्या दुकानाबाहेर ठेवण्यात आल्या होत्या. जेव्हा दुकानदार आला आणि त्याने पोत्या गायब झाल्याचं पाहिलं तेव्हा त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यालाही धक्का बसला.
ज्या गाडीतून हे चोर आले ती गाडी 15 लाखांची आहे. तर चोरांनी चोरलेलं मीठ फक्त 150 रुपयांचं . दीडशे रुपयांचं मीठ चोरण्यासाठी चोर 15 लाख रुपयांच्या गाडीतून आले. 15 लाखांच्या गाडीतून त्यांनी 150 रुपयांचं मीठ पळवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.