जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लाल भेंडी पिकवून शेतकरी झाला मालामाल; 800 रुपये किलो मिळतोय दर, जाणून घ्या खासियत

लाल भेंडी पिकवून शेतकरी झाला मालामाल; 800 रुपये किलो मिळतोय दर, जाणून घ्या खासियत

लाल भेंडी पिकवून शेतकरी झाला मालामाल; 800 रुपये किलो मिळतोय दर, जाणून घ्या खासियत

मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील खजुरी कलान (Khajuri Kalan) येथील शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी आपल्या शेतात लाल भेंडी (Red Ladyfinger) लावली आहे, ज्याची किंमत 800 रुपये किलो (Red Ladyfinger Price) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 07 सप्टेंबर : एक किलो भेंडीसाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता? 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये की 800 रुपये. जर तुम्ही 800 रुपये किलो असणारी भेंडी विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की 800 रुपये किलो मिळणारी ही भेंडी कोण आणि कुठे विकत आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील खजुरी कलान (Khajuri Kalan) येथील शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी आपल्या शेतात लाल भेंडी (Red Ladyfinger) लावली आहे, ज्याची किंमत 800 रुपये किलो (Red Ladyfinger Price) आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मिश्रीलाल राजपूत यांनी हेदेखील सांगितलं, की ही भेंडी इतकी महाग का आहे आणि याची खासियत काय (Red Ladyfinger Benefits) आहे. शिकार करायला आला अन् विहिरीत पडला; मांजरीने बिबट्याला दिली कडवी झुंज, पहा VIDEO सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. ज्या लोकांना हृदयासंबंधीचे आजार किंवा ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भेंडी अतिशय आरोग्यदायी आहे. सोबतच ज्या लोकांना मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठीही ही उपयोगाची आणि फायद्याची आहे. मंडपातच नवरीबाईनं दिरांसोबत धरला ठेका; जबरदस्त Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ भेंडीच्या उत्पादनाबद्दल बोलताना मिश्रीलाल यांनी सांगितलं, की मी वाराणसीच्या अॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिट्यूटमधून 1 किलो भेंडीचं बीज विकत घेतलं होतं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बीज पेरलं. 40 दिवसांनंतर भेंडी यायला सुरुवात झाली. मिश्रीलाल यांनी सांगितलं, या भेंडीच्या शेतीत कोणतंही घातक किंवा हानिकारक किटकनाशक वापरलं गेलं नाही. त्यांनी सांगितलं, की एका एकरात कमीत कमी 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल भेंडीचं उत्पादन मिळतं. भेंडीच्या किमतीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की ही सामान्य भेंडीपेक्षी 7-8 पटीनं महाग असते. काही मॉलमध्ये 500 ग्रॅम लाल भेंडीची किंमत 300-400 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात