मराठी बातम्या /बातम्या /nashik /

शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत; बिबट्याला भिडली इवलीशी मांजर, पाहा नाशकातील थरारक VIDEO

शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत; बिबट्याला भिडली इवलीशी मांजर, पाहा नाशकातील थरारक VIDEO

Leopard and Cat come face to face: सुरवातीला बिबट्या आणि मांजर यांच्यात संघर्ष झाला. मात्र तेच बिबट्या आणि मांजर एकमेकांच्या अंगावर खेळतांना दिसून आले.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 7 सप्टेंबर : बिबट्या अवघ्या काही सेकंदांतच आपल्या शिकारीवर झडप घेतो असं तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता नाशिकमधील असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही अवाक व्हाल. झालं असं की, मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला. यावेळी मांजरीने त्याला चकवा दिला. यानंतर मांजर आणि बिबट्या दोघेही शेजारील विहिरीत पडले.

बिबट्याला भिडली मांजर

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावातील ही घटना असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्या मांजरीची शिकार करण्यासाठी पाठलाग करता करता विहिरीत कोसळला. मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले. विहिरीची खोली भरपूर असल्याने दोघेही आतच अडकून पडले.

450 रुपयांसाठी धारदार शस्त्राने घरात घुसून गुंडाची हत्या

रात्रभर दिली कडवी झुंज

रात्री बिबट्या आणि मांजर दोघेही विहिरीत कोसळले. यावेळी इवल्याशा मांजरीने हिस्त्र अशा बिबट्याचा सामना करत त्याला कडवी झुंज दिली. रात्रभर दोघेही एकमेकांसमोर गुरगुरत बसले होते.

पहाट होताच बिबट्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली असता हा प्रकार समोर आला. यानंतर ग्रामस्थांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात व्हिडीओ कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुरवातीला बिबट्या आणि मांजर यांच्यात संघर्ष सुरू होता. मात्र नंतर तेच बिबट्या आणि मांजर एकमेकांच्या अंगावर खेळतांना दिसून आले.

First published: