मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलाला घाबरवण्यासाठी वडील बनले राक्षस, अवस्था पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

मुलाला घाबरवण्यासाठी वडील बनले राक्षस, अवस्था पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

मुलाला घाबरवण्यासाठी राक्षसाचा मुखवटा (Viral Video of father and son) लावणाऱ्या आणि ते पाहून भितीने गाळण उडालेल्या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

मुलाला घाबरवण्यासाठी राक्षसाचा मुखवटा (Viral Video of father and son) लावणाऱ्या आणि ते पाहून भितीने गाळण उडालेल्या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. अनेकदा भीती आणि विनोद (Combination of fear and humor) या दोन्हींच्या मिश्रणातून तयार झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीमुळे त्याची फजिती होत आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ गेल्या काही महिन्यांत जोरदार गाजत आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ (Social media viral video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात एक वडील आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं दिसतं.

View this post on Instagram

A post shared by YouTube (@youtube)

वडिलांनी घेतलं व्हेनमचं रूप

मुलाला घाबरवण्यासाठी व्हेनम नावाच्या राक्षसाचा मुखवटा वडील परिधान करतात. व्हेनम हे एक प्रसिद्ध व्हिलन पात्र आहे. स्पायडर मॅन या चित्रपटात हे पात्र होतं. त्याच्याप्रमाणे वेषभूषा करून मुलाला घाबरण्याची तयारी वडिलांनी केल्याचं या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतं. त्यानंतर वडील पूर्ण वेश परिधान करतात. मुलाला घाबरवण्यासाठी योग्य जागा कुठली याचा विचार करतात आणि तिथं जाऊन उभे राहतात.

जिन्यात मुलाची घाबरगुंडी

घराच्या जिन्यात उभं राहून मुलाला घाबरवण्याचा प्लॅन ते करतात. त्यासाठी जिन्यात शांतपणे व्हेनमच्या वेषात उभे राहतात. थोड्याच वेळात मुलगा तिथं येतो आणि जिन्यात उभी असलेली आकृती पाहून भितीने त्याची गाळण उडते. तो इतका घाबरतो की चक्कर येऊन खाली पडतो. ज्या प्रकारे हा मुलगा घाबरतो, ते पाहून अनेकांना हसू आवरत नाही.

हे वाचा- बॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले....

कल्पनेनेच भीती

हा व्हिडिओ स्लो मोशनमध्येदेखील दाखवण्यात आला आहे. त्यानुसार आपल्या वडिलांनी व्हेनमचा ड्रेस आणि मुखवटा घातला आहे, हे पाहण्याआधीच मुलगा घाबरतो. जिन्यात कुणीतरी उभं आहे, या कल्पनेनेच तो खाली कोसळताना दिसतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Father, Son, Video viral