मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Joint Pain In Winters : सांधे जखडत असतील तर या 5 गोष्टी खाण्याचे टाळाच; हिवाळ्यात होतो जास्तच त्रास

Joint Pain In Winters : सांधे जखडत असतील तर या 5 गोष्टी खाण्याचे टाळाच; हिवाळ्यात होतो जास्तच त्रास

थंडीच्या मोसमात वेदना कमी करण्यासाठी सांधे मालिश आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन आहाराशी संबंधित गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. सांधे आणि हाडांमध्ये वेदना किंवा कडकपणा असल्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,16 नोव्हेंबर:

नवी दिल्ली,16 नोव्हेंबर: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखी (Joint Pain) आणि थंड वातावरणात नियमित व्यायाम केल्यानं वेदना कमी होतात. यासोबतच तुमच्या रोजच्या आहाराशी संबंधित काही बाबींकडेही लक्ष दिलं पाहिजे. सांधे आणि हाडांमध्ये वेदना किंवा आखडल्यासारखं जाणवल्यास आहारातील काही पदार्थ काटेकोरपणे टाळणं (Joint Pain In Winters ) आवश्यक आहे.

हाडं दुखणं किंवा सांधे आखडल्यानं त्रस्त असलेल्या लोकांसाठी हिवाळा त्रासदायक असतो. आरोग्य तज्ज्ञांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या मोसमात वेदना कमी करण्यासाठी सांध्यांना मालिश आणि नियमित व्यायाम उपयुक्त ठरतात. आपल्या दैनंदिन आहाराशी संबंधित गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. सांधे आणि हाडांमध्ये वेदना किंवा आखडल्यासारखं जाणवल्यास काही पदार्थ खाण्याचं टाळणं आवश्यक आहे.

हे वाचा - एकाच झाडावर होते तीन कोब्रा, मेळघाटात रंगली अवताराची चर्चा; पाहा PHOTOs

मीठ - आर्थरायटिस फाउंडेशनच्या मते, मीठ कमी किंवा योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होण्यास मदत होते. असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. यामुळं सांधेदुखीची समस्या नियंत्रणात राहील. तसंच, ऑस्टिओपोरोसिस (हाडांचे विकार) आणि फ्रॅक्चरचा धोकाही कमी होईल. मीठामुळे शरीरात द्रव टिकून राहते, ज्यामुळे सांध्यातील सूज आणि दुखण्याची समस्या वाढते.

ग्लुटेन - एखाद्या व्यक्तीला ग्लुटेनची अ‌ॅलर्जी असू शकते. अशा लोकांनी गहू, बार्लीसारखे वात निर्माण करणारे ग्लुटेनयुक्त पदार्थ खाणं टाळावं. ग्लूटेनमुळं शरीरात भागभगण्याची समस्या वाढते. जर तुम्हाला हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ग्लूटेनयुक्त आहारापासून दूर राहा.

अल्कोहोल- अल्कोहोलमुळे सांधेदुखीच्या रुग्णांना खूप त्रास होतो. 278 लोकांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, अल्कोहोलचं सेवन केल्यानं आपल्या पाठीच्या कण्याच्या संरचनेला हानी पोहोचते. अल्कोहोलमुळे ऑस्टियोआर्थराइटिसचा धोका देखील वाढतो.कॅल्शियमची पातळी कमी होणे टाळता येते. यामुळे ऑस्टिओपोरोसिस (हाडांचे विकार) आणि फ्रॅक्चरचा धोकाही कमी होईल. मीठामुळे शरीरात द्रव टिकून राहते, ज्यामुळे सांध्यातील सूज आणि दुखण्याची समस्या वाढते.

हे वाचा - Low Blood Pressure: कमी रक्तदाबाची ही असतात कारणं, वेळीच ओळखा त्याची लक्षणं

बेकरी उत्पादनं टाळा - कोला, मिठाई, फळांचे कृत्रिम रस, ब्रेड किंवा रिफायनरी उत्पादनं यांसारख्या साखरयुक्त आणि बेकरी उत्पादनं टाळणंदेखील आवश्यक आहे. शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यानं सांधेदुखीच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. असे पदार्थ शरीरात भगभगण्याच्या समस्येसह सांधेदुखीला खतपाणी घालतात.

लाल मांस- बोकड किंवा इतर मटणात भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड आढळतात. या दोन्ही गोष्टींचा शरीरातील जळजळण्याशी थेट संबंध आहे. ते खाल्ल्याने सांध्यातील जडपणा वाढतो आणि वेदनाही वाढतात.

First published:

Tags: Health Tips, Pain