सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे आणि अनेक जोडपी लग्न बंधनात अडकली आहे. त्यामुळे आता येणारे सगळेच सण त्यांच्यासाठी लग्नानंतरचे पहिले सण असणार आहे आणि आपल्या भारती संस्कृतीप्रमाणे हे लग्न झाल्यानंतरच्या पहिल्याच सणांना खूपच महत्व आहे. आता मकरसंक्रांत येणार आहे. हा दिवस नवीन जोडप्यांसाठी खास असणार आहे, कारण ही त्यांची पहिली संक्रांत असणार आहे. आता नवीन लग्न म्हटलं की मराठी उखाणे तर येणारच. नवीन जोडप्याला या दिवशी उखाणे घेण्यासाठी सांगितलं जातं. मग अशाच या खास दिवसासाठी आम्ही काही ट्रेंडिंग आणि लेटेस्ट उखाणे घेऊन आलो आहोत. जे तुमच्यासाठी कामाचे आहेत.
- तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, ….रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत. हे ही पाहा : Marathi Ukhane: नवरा-नवरीसाठी खास 30 नवीन आणि मॉर्डन उखाणे 2. मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत, ….रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत. 3. मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा, …… रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा. 4. मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख, ….रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.
- कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी, …..रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी. 6. मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा, …रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा. 7. संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून, …माझी दिसते, सर्वात उठून. 8. मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग, ….रावांची आवड आहे, सत्संग.
- सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, ….रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ. 10. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, …रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.