मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Lockdown मध्ये बाईकवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, VIDEO VIRAL

Lockdown मध्ये बाईकवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, VIDEO VIRAL

कोरोनाला लढा देण्यासाठी देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय आहे.

कोरोनाला लढा देण्यासाठी देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय आहे.

कोरोनाला लढा देण्यासाठी देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय आहे.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 03 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. या व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीनं लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सचं पालन केलं जात आहे. नागरिकांना आवाहन करूनही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. यातच सोशल डिस्टन्सिंगसाठी भन्नाट आयडिया वापरल्या जातात. काही दिवसांपूर्वी एक हॅट तुफान व्हायरल झाली होता. सोशल डिस्टन्सचं पालन होईल एवढी मोठी ही हॅट होती. त्यानंतर आता वेळीची बचत करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दुचाकीवरून जाताना सोशल डिस्टन्सचं पालन कसं करता येईल हे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणाऱ्या एका भन्नाट दुचाकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता जसं दुचाकीवर बसतो त्याप्रमाणे ही दुचाकी आहे पण त्यामध्ये एक फुटाचं अंतर आहे. दोन जणांमध्ये हे सोशल डिस्टन्स बाळगणं कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ही बाईक उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. भन्नाट आयडिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर या तरुणाचं तुफान कौतुक होत आहे. आतापर्यंत जगभरात 3,514,030 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 2, 45,584 रुणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 1,133,382 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनावर लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी हा संसर्ग रोखण्यासाठी घरी राहणं आणि सोशल डिस्टन्स बाळगणं आवश्यक आहे असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. हे वाचा : सोशल डिस्टन्स ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल,काठी वापरून घातली 'वरमाला'
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या