• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • हेच बाकी राहिलं होतं! मास्क विसरली म्हणून महिलेनं तोंडाला लावलं सॅनिटरी पॅड

हेच बाकी राहिलं होतं! मास्क विसरली म्हणून महिलेनं तोंडाला लावलं सॅनिटरी पॅड

30 वर्षांची टेलर नावाची महिला खरेदीसाठी घाईगडबडीत घराबाहेर पडली. मात्र त्यावेळी मास्क घ्यायचा विसरली.

 • Share this:
  मुंबई, 11 ऑक्टोबर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क ही अत्यावश्यक आणि गरजेची वस्तू आहे. बऱ्याच ठिकाणी मास्क नसेल तर दुकानांमध्ये किंवा बाहेर फिरण्यासही मनाई केली जाते. कधीकधी आपण गडबडीत मास्क घरीच विसरून येतो. अशावेळी नवीन मास्क घेणं किंवा काहीतरी जुगाड करणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मास्क विसरल्यानंतर लोकांनी काय काय जुगाड केले त्याचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले. मात्र त्यामध्ये सध्या एका फोटोची तुफान चर्चा होत आहे. खरेदी करायला मॉलमध्ये गेलेली महिला चक्क मास्क विसरली म्हणून तिने जुगाड करून सॅनिटरी पॅड वापरलं. हे सॅनिटरी पॅड मास्क सारखं तोंडाला लावून या महिलेनं मॉलमध्ये सगळी खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो ब्रिटनमधला असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-बाप रे! त्वचेवर तब्बल 9 तास राहू शकतात कोरोनाचे विषाणू, अशी घ्या काळजी 30 वर्षांची टेलर नावाची महिला खरेदीसाठी घाईगडबडीत घराबाहेर पडली. मात्र त्यावेळी मास्क घ्यायचा विसरली. मास्क नसल्यानं तिला शॉपिंग मॉलमध्ये अडवण्यात आलं. बकौल टेलर या महिलेनं मास्क शोधला मात्र मास्क न मिळाल्यानं अखेर बॅगेतलं सॅनिटरी पॅड काढून तोंडाला मास्क सारखं लावलं आणि त्यानंतर खरेदी केली. त्यांच्यावर मॉलमधले लोक हसत होते मात्र दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि संसर्ग होऊ नये यासाठी मास्कही जरूरी होता. हे वाचा-200 कोरोना रुग्णांना पोहोचवलं रुग्णालयात, त्याच कोरोना योद्ध्याने गमावला जीव भारतातही अजूनही लोक विनामास्कचे फिरताना पाहायला मिळत आहेत. इतकच नाही तर अनेक ठिकाणी मास्क विसरल्यानंतर वेगवेगळे जुगाड केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका माणसानं बँकेत मास्क विसरल्यानंतर सदरा डोक्यावर घेतला होता तर एका महिलेनं तोंडाला पानं लावली होती. एका तरुणानं नाकाला मास्क म्हणून शूज बांधले होते तर एका तरुणीनं बाटली कापून घातल्याचेही फोटो तुफान व्हायरल झाले होते.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: