देव तारी...! 2 ट्रॅकमध्ये अडकून झाला व्हॅनचा चुराडा, ड्रायव्हरला मृत समजून उचललं आणि...

देव तारी...! 2 ट्रॅकमध्ये अडकून झाला व्हॅनचा चुराडा, ड्रायव्हरला मृत समजून उचललं आणि...

कधीकधी माणसाचा काळ आलेला असतो, मात्र त्याची वेळ आलेली नसते. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली. एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या रस्ता अपघातात वाचला.

  • Share this:

लंडन, 11 ऑक्टोबर : देव तारी त्याला कोण मारी, अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. कधीकधी माणसाचा काळ आलेला असतो, मात्र त्याची वेळ आलेली नसते. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली. एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या रस्ता अपघातात वाचला. हा अपघात इतका भयंकर होता की एखाद्याचा जागीच मृत्यू झाला असता, मात्र या व्यक्तीच्या अंगाला खरचटलही नाही.

हा रस्ते अपघात यूकेच्या लीसेस्टर शहरात झाला. अलीकडे या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक वाढले आहे. दरम्यान, एक व्यक्ती व्हॅनमधून जात असताना दोन ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. या दोन ट्रकमध्ये व्हॅन मधोमध अडकली. व्हॅनचा चुराडा झाला, मात्र ड्रायव्हरचा खरचटलंही नाही. याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर व्हॅनचा चुराडा झालेला दिसत आहे.

वाचा-सुसाट दुचाकी-कारची धडक; 2 फूट उंच उडून तरुण खाली पडला, पाहा थरारक VIDEO

With Wareham Fire Station

On the M1 on Friday, Leicestershire Police were called to this RTC. The driver of the van in...

Posted by Idiot UK Drivers Exposed on Thursday, 8 October 2020

वाचा-हायवेवर झोपून काढत होते Naked Selfie, मागून आली पोलिसांची गाडी आणि...

हायवेवरील या भीषण अपघातानंतरही व्हॅनचा चालक बचावला. त्याला काही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर ते व्हायरल होत आहेत. यावर व्हॅन चालकाचे म्हणणे आहे की त्याचा पुर्नजन्म झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 11, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या