सिंगापूर, 10 ऑक्टोबर : बंगळुरूनंतर आणखीन एक विचित्र अपघाताचा थरारक VIDEO समोर आला आहे. भरधाव कार आणि दुचाकीची धडक झाली आहे. भरचौकात सुसाट असलेली दुचाकी कारवर येऊन धडकली. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता चौकात समोरून कार येत असताना उलट दिशेनं सुसाट दुचाकीस्वार जात असताना समोरून येणाऱ्या कारवर दुचाकी धडकते. ही धडक इतकी भीषण आहे की त्याचा आवाज वेग आणि त्यानंतर त्या गाडीची काय अवस्था झाली हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंगापूरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
Wish the rider speedy recovery
— Singapore Roads Accident.Com (@RoadsCom) October 10, 2020
Accident along hougang..
Hopefully this footage can help this rider. pic.twitter.com/tiFRcNYs1Q
SMR1624U Honda Fit (PHV) failed to keep a proper look out, resulted in poor motorcycle uncle collided on to the car.
— Singapore Roads Accident.Com (@RoadsCom) October 10, 2020
Happened yesterday, 29/09/20, 1215hrs @ junction of Teck Whye Ave & Teck Whye Lane pic.twitter.com/91T3TALAy4
हे वाचा- अरे देवा! रोटी करताना अंदाज चुकला आणि काय घडलं पाहा VIDEO दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकी आणि कारची धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार उडून लांब पडला. या दुचाकीस्वाराचं वेगावर नियंत्रण नव्हतं आणि अचानक समोरून कार आल्यामुळे हा अपघात झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही काळासाठी चौकातली वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताची माहिती घेतली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.