जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! बोटांच्या चिमटीत राहिल इतका, पण त्याने जिवंत माणसाला खाल्लं; तुमच्याही घरात राहतोय हा कीटक

बापरे! बोटांच्या चिमटीत राहिल इतका, पण त्याने जिवंत माणसाला खाल्लं; तुमच्याही घरात राहतोय हा कीटक

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

घरात आढळून येणाऱ्या छोटाशा किड्याने एका जिवंत माणसाला चावून खाल्लं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा केला जातो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 16 एप्रिल : आपल्या घरात मुंग्या, झुरळ, पाल, उंदीर असे छोटेमोटे किडे, किटक, प्राणी असतातच. पण तसा त्यांच्यापासून आपल्या जीवाला थेट धोका नसतो. म्हणजे हे प्राणी स्वतः आपला जीव घेत नाहीत. चुकून ते अन्नपदार्थ किंवा पाण्यात पडले आणि तसं पाणी किंवा पदार्थ आपल्या पोटात गेलं तर मात्र आपल्याला हानी पोहोचू शकते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल घरात राहणाऱ्या अशाच एका छोट्याशा कीटकाने मात्र एका माणसाचा थेट जीव घेतला आहे. अमेरिकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. अटलांटा तुरुंगात बंदिस्त असलेल्या एका जिवंत कैद्याला एका छोट्याशा कीटकाने चावून चावून खाल्लं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा दावा केला जातो आहे. या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय लॅशोन थॉम्पसनला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मारहाणीचा आरोप होता. अटकेनंतर त्याची रवानगी फुल्टन काउंटी जेलमध्ये करण्यात आली. थॉम्पसन मानसिक आजारी असल्याने त्याला मनोरुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी 13 सप्टेंबर रोजी तो त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला होता.

News18लोकमत
News18लोकमत

त्याला किड्याने जिवंत खाल्ल्याचा आरोप त्याचा कुटुंबाने केला आहे.  तपासणीतीतही थॉम्पसनच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तर त्याच्या शरीरावर कीटकाने कुरतडलेल्या खुणा होत्या. या क्युट पक्ष्यांना स्पर्श करताच होऊ शकतो तुमचा मृत्यू; चुकूनही जवळ जाऊ नका थॉम्पसनच्या कुटुंबाने सांगितलं की, थॉम्पसनला ज्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं ते माणसांना राहण्यासाठी अजिबात योग्य नव्हतं. अशा स्थितीत त्याला कीटकांचा संसर्ग झाला होता. किड्याने त्याला जिवंत खाल्लं होतं. थॉम्पसनचे कौटुंबिक वकील मायकेल डी. हार्पर यांनीही थॉम्पसनच्या मृतदेहाचे फोटो कोर्टात सादर केले. ज्यात लाखो कीटक, किडे फिरत असल्याचं दिसत होतं. हार्पर म्हणाले की, थॉम्पसनची प्रकृती सतत खालावत चालली होती, परंतु त्याला पाहण्यासाठी आणि मदत करणारे कोणीही नव्हते, त्याला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. तुरुंगातील अस्वच्छता हे त्याच्या मृत्यूचे कारण होतं. त्याला इतकी वाईट वागणूक मिळायला नको होती, तो अशा मृत्यूला अजिबात पात्र नव्हता. याप्रकरणी योग्य तो तपास व्हावा. धडावेगळं झालं सापाचं डोकं, मृत म्हणून व्यक्तीने शेपटी धरताच…; थरकाप उडवणारा VIDEO द गार्डियन या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, थॉम्पसनचा जीव घेणारा कीटत दुसरा तिसरा कुणी नाही तर ढेकूण होता. हो तोच ढेकूण जो आपल्या घरात लाकडी फर्निचरच्या कोपऱ्यांमध्ये असतो. ढेकून चावतात, रक्त शोषतात हे तर आपल्याला माहिती आहे. पण ते एखाद्या माणसाला जिवंत चावून खाऊ शकतात आणि त्यांचा जीवही घेऊ शकतात, या प्रकरणामुळे आता सर्वांना चिंतेत टाकलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात