मुंबई, 07 एप्रिल : सापाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका सापाचं डोकं गायब होतं. तो मृत असावा असं समजून एका व्यक्तीने त्याची शेपटी धरली. पण त्यानंतर जे घडलं ते शॉकिंग आहे. साप अचानक जिवंत झाला आणि व्यक्तीसोबत भयंकर घडलं. बहुतेक जीव ज्यांचं शीर धडापासून वेगळं झालं तर ते जिवंत राहत नाहीत, त्यांचा मृत्यू होता. या सापाचंही डोकं गायब होतं, आता अपघातात सापाचं डोकं गेलं की ते मुद्दाम कापण्यात आलं याची माहिती नाही. पण या व्हिडीओत जमिनीवर डोकं नसलेला हा साप दिसतो आहे. तो जमिनीवर मृत पडला आहे. त्याच्या शरीराची काहीच हालचाल नाही आहे.
एक व्यक्ती या सापाजवळ बसली आहे. साप मृत असावा असं समजून ती त्याच्या शेपटीला धरते. त्या व्यक्तीच्या हातात कात्री आहे. कात्रीत ती त्या सापाच्या शेपटीला पकडायला जाते. इतक्यात साप…
Snake in private part : बापरे बाप! तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप; डॉक्टरांनी पाहिलं तेव्हा…
मृत साप अचानक जिवंत होतो. सापाचं डोकं गायब असलं तरी त्याच भागाकडून सापाची हालचाल होते. जसं जिवंत असल्यावर साप हल्ला करतो अगदी तसाच हा सापही त्या व्यक्तीवर हल्ला करायला जातो.
सापाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे आणि त्यावर अनेक कमेंट येत आहेत. चीनमध्येही घडली होती अशी घटना दक्षिण चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने कोब्रा नागाच्या सूपची ऑर्डर दिली. तेव्हा शेफ पेंग फॅन यांना दुर्मीळ पदार्थ करण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी इंडोचायनीज कोब्रा नाग (Cobra) घेतला आणि त्याचे डोके छाटून टाकलं आणि ते पुढची पाकक्रिया करायला वळले. 20 मिनिटांत सूप तयार झालं आणि शेफ पेंग फॅन किचनची साफसफाई करू लागले. इथंच त्यांचे दुर्दैव आड आले. त्यांनी सूप करण्यापूर्वी कोब्राचे छाटून टाकलेलं डोकं कचऱ्यात टाकण्यासाठी उचलले आणि त्याच क्षणी त्या कोब्राने त्यांना दंश केला.
…अन् पाहता पाहता अजगरानं गायीला जिवंत गिळलं, Video पाहून खळबळ
सापाचे किंवा नागाचे डोके (Cobra’s Head) देहापासून वेगळे झाले तरी ते किमान एक तासभर जिवंत असते. काही वेळा ते त्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकते त्यामुळे दक्षता घेणं आवश्यक आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.