छोटे, क्युट, कलरफुल पक्षी पाहताच आनंद होता. त्यांना हात लावल्याशिवाय मन राहत नाही. काही लोक अशा पक्ष्यांना पाळतात. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
पण असेच क्युट दिसणारे काही पक्षी तुमचा जीव घेऊ शकतात. डेनिश संशोधकांनी अशाच पक्ष्यांच्या दोन नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत, ज्या खतरनाक, घातक आहेत. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
न्यू गिनी जंगलात आढळणारे हे पक्षी विषारी पदार्थ खातात आणि स्वतःच्या शरीरात त्याचं विष तयार करतात. हे विष ते आपल्या पंख्यांमध्ये साठवून ठेवण्याची त्यांची क्षमता आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
या पक्ष्यांच्या पंखांमध्ये बॅट्राकोटॉक्सिन हे न्यूरोटॉक्सिन असतं. हे विष या पक्ष्यांमध्ये दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या डार्ट फ्रॉग या विषारी बेडकइतकातील विषाइतकंच खतरनाक आहे. ज्याला स्पर्श करताच मृत्यू होतो. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
यापैकी पहिला पक्षी आहे रिजेंट व्हिस्लरल. जो भारत-प्रशांत क्षेत्रात आढळणाऱ्या पचीसेफला श्लेगेली प्रजातीतील आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)
तर दुसरा पक्षी आहे रूफस नेप्ड बेलबर्ड जो एलेड्रियास रूफिनुचा प्रजातीतील आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)