मुंबई 25 जानेवारी : सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी खूपच मजेदार असतात तर काही लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमधील व्यक्ती हा खूपच भारी कलाकार आहे. या मुलाने आधी शब्दात ताजमहल लिहिलं आणि मग पाहाता पाहाता त्याने या शब्दांना खऱ्या ताजमहलमध्ये बदललं. काळ्या फळ्यावर पांढरा शुभ्र ताजमहल खूपच उठून दिसतोय. हे ही पाहा : आवडीने समोसा खाताय? हा Video पाहून पुन्हा कधीही खाण्याचा विचार करणार नाही व्हिडीओमध्ये एक कलाकार आपल्या कलाकृतीने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. जणू काही या कलाकाराचा हात रॉकेटच्या वेगानेच काम करत आहे, अशाप्रकारे तो ताजमहल रेखाटत आहे. यानंतर काही सेकंदात डिझाईन फळ्यावर उतरवतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मुलाने नक्की असं काय केलंय? तर या मुलाने प्रथम ताजमहाल ब्लॅक बोर्डवर लिहिले आहे आणि ताजमहालच्या त्याच शब्दांनाच आकार देत ताजमहल बनवलं आहे.
व्हिडीओ हा छोट्या कट मध्ये शेअर करण्यात आला आहे, तो मधी फार्टफॉर्वड तर मध्येच स्लो होत आहे. तुम्ही जेव्हा शेवटी या तरुणाचं चित्र पाहाल तर खरोखरंच तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडीओ पाहाल. हा व्हिडीओ खरंच कौतुकास्पद आहे. हे ही पाहा : भूत, प्रेत की आणखी काही? CCTV मध्ये लोकांना दिसली अशी गोष्ट Video पाहून फुटेल घाम या व्हिडीओला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला भरभरुन लाईक, शेअर आणि कमेंट्स मिळाले आहेत. लोक या तरुणाची स्तुती करण्यात मागे हटत नाहीयत.