मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आवडीने समोसा खाताय? हा Video पाहून पुन्हा कधीही खाण्याचा विचार करणार नाही

आवडीने समोसा खाताय? हा Video पाहून पुन्हा कधीही खाण्याचा विचार करणार नाही

समोसासाठी बटाटा पायाने स्मॅश करताना

समोसासाठी बटाटा पायाने स्मॅश करताना

या व्हिडीओमधील व्यक्तीने तर हद्दच पार केली. तो न साल सोलता बटाटे एका भांड्यात स्मॅश करत आहे, ते देखील आपल्या पायांनी. शिवाय या व्यक्तीने घानेरडी चप्पल देखील घातली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 जानेवारी : भारतीयांना चटपटीत जेवण खायला आवडतं. त्यात समोसा म्हणजे अनेकांचं आवडीचा पदार्थ आहे. संध्याकाळच्या भूकेला जर कोणी समोसा असं नाव जरी घेतलं तरी तोंडात पाणी येतं. असे अनेक लोक आहेत ज्यांना समोसा खाण्याची क्रेविंग देखील होते. समोसा खाण्याचे काही प्रकार आहेत यामध्ये साधा समोसा, पट्टीचा समोसा, चाट समोसा, दही समोसा असे वेगवेगळे प्रकार आहेत.

आता इतके समोसाचे नाव घेतल्यानंतर तुमच्या मनात समोसाचा वास घुमलाच असणार आणि खाण्याची इच्छा झाली असणार. पण जरा थांबा, आज आम्ही तुम्हाला यासंबंधीचा असा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हाला आजपासून समोसा खाण्याची किळस येईल किंवा तो खाण्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील करणार नाही.

हे ही पाहा : सायको सिरियल किलरने 32 जणांना मारुन शिजवलं मांस, स्टॉल लावून विकले बर्गर पॅटी आणि...

समोसामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे बटाटा. याशिवाय समोसा अपूर्णच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बटाट्यामुळे पोट भरतं आणि चव देखील चांगलीच लागते.

आपण घरी बटाट्याची साल काढतो आणि वापरतो पण असे अनेक लोक आहेत. जे बटाटे सोलण्याऐवजी डायरेक्ट वापरतात. आता इथ पर्यंत सगळं ठिक आहे. बटाटे न सोलता देखील चांगले धुवून वापरले तर काहीच हरकत नाही.

पण या व्हिडीओमधील व्यक्तीने तर हद्दच पार केली. तो न साल सोलता बटाटे एका भांड्यात स्मॅश करत आहे, ते देखील आपल्या पायांनी. शिवाय या व्यक्तीने घानेरडी चप्पल देखील घातली आहे, ज्याच्या मदतीने तो बटाटे चुरडत किंवा स्मॅश करत आहे.

हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच लोकांना धक्काच बसला आहे. दुकानातील एक कर्मचारी समोसे तयार करण्यासाठी पायांचा वापर करत असल्याचे पाहून सोशल मीडियावर लोकांना आश्चर्य वाटले. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीने दुकानातील कारखान्यातील एका मोठ्या टबमध्ये बटाटे ठेवले आणि नंतर त्यात पाणी भरले.

त्याने पायात चप्पल घातली आहे आणि त्यानंतर तो सतत त्या बटाट्यांना पायाने तुडवत आहे. हा बटाटा समोसासाठी तयार केला जात आहे, जो काहीवेळाने गरम समोसामध्ये असेल आणि लोक त्याला आवडीने खातील. आता एवढं मोठं भांडं पाहून तुम्ही अंदाजा लावूच शकता की हा समोसा साधारण ५०० ते ४०० लोकांसाठी बनवला जात आहे. म्हणजेच काय तर इतके लोक हा अनहायजिनिक आणि घानेरडा समोसा खाणार आहे.

समोसाप्रेमी दुकानात जाऊन ३-४ समोसे आरामा खातात आणि मग चवीची त्याची स्तुती करतात. पण आता जो कोणी हा व्हिडीओ पाहिला तो पाहून तुम्हाला त्याला हसू येईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.

हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांना भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. शिवाय अनेकांनी आपल्या मित्र मैत्रिणींना देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे, ज्याला आपण पळवून लावण्याची गरज आहे. नाहीतर यामुळे कित्याक जणांना फूड पॉइजन होऊ शकतं.

First published:

Tags: Food, Shocking, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral