जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आकाशात झेप घेत गरुडांचा मनमोहक डान्स; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

आकाशात झेप घेत गरुडांचा मनमोहक डान्स; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

आकाशात झेप घेत गरुडांचा मनमोहक डान्स; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

अनेकदा तुम्ही गरुडाला हवेत उंच उडून शिकार करताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की हा पक्षी जितका धोकादायक शिकारी आहे तितकाच चांगला प्रेमीदेखील आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : निसर्ग आणि त्याची रचना अतिशय सुंदर आहे. मात्र अगदी धावपळीच्या या जीवनात याचं सौंदर्य निहाळण्यासाठी अनेकांकडे वेळच नाही. परंतु, प्रत्यक्षात जरी याचा आनंद घेणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी आजकाल सोशल मीडियाने हे अधिक सोपं केलं आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला निसर्गातील अशीच अद्भुत दृश्य पाहायला मिळतात, जी मनाला सुखावून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ (Video Viral on Social Media) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ (Dance Video of Eagles) तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, LIVE VIDEO अनेकदा तुम्ही गरुडाला हवेत उंच उडून शिकार करताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की हा पक्षी जितका धोकादायक शिकारी आहे तितकाच चांगला प्रेमीदेखील आहे. याचाचा प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गरुडाची जोडी आकाशात असं काही करताना दिसते, जे यापूर्वी तुम्ही क्वचितच पाहिलं असेल.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गरूडाची ही जोडी जमिनीपासून काही अंतर वरती उडते. उंचावर पोहोचताच ही जोडी एकमेकांच्या जवळ येते आणि एकमेकांचे पंजे पकडून आपलं प्रेम व्यक्त करते. हा खास व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. VIDEO : 62 वर्षांच्या आजीने सरसर चढत गाठलं पर्वताचं उंच शिखर; पाहून तरुणही थक्क हा मनमोहक व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की हे दृश्य अतिशय सुंदऱ आहे, मला त्यांच्यावर प्रेम झालंय. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, लव्ह इज इन द ईअर, अद्भुत. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात