Home /News /lifestyle /

VIDEO : साडी नेसूनच 62 वर्षांच्या आजीने सरसर चढत गाठलं पर्वताचं उंच शिखर; थक्क होऊन पाहत राहिले तरुण

VIDEO : साडी नेसूनच 62 वर्षांच्या आजीने सरसर चढत गाठलं पर्वताचं उंच शिखर; थक्क होऊन पाहत राहिले तरुण

62 वर्षांच्या आजीने पर्वतावर केलेली चढाई पाहून तरुणांनीही तोंडात बोटं घातली आहेत.

  तिरुवनंतपुरम, 21 फेब्रुवारी : जसजसं वय वाढतं तसतसं अनेकांचं स्वतःच्या शरीरावरही नियंत्रण राहत नाही. म्हणजे तोल सावरत नाही, धावणं सोडा साधं चालतानाही तोल जातो. कितीतरी वयस्कर व्यक्ती चालता चालता पडतात. त्यामुळे त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. पण वयाच्या साठीत असलेल्या या आजीने तर पर्वत चढत उंच शिखर गाठलं आहे (62 Year old woman climb peaks). तिचं हे करतब पाहून तरुणही थक्क झाले आहेत. सर्वांनी त्यांच्या या साहसाचं कौतुक केलं आहे. कर्नाटकच्या बंगळुरूतील (Bengaluru) 62 वर्षांच्या नागरत्नम्मा (Nagaratnamma), 62 वर्षांच्या आहेत. पण वय हा फक्त आकडा आहे. उत्साह, इच्छा, चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही, हे या आजीने दाखवून दिलं आहे. काही तरुणांनाही जमणार नाही किंवा काही तरुण करायलाही घाबरतात ते या वृद्ध महिलेने करून दाखवलं आहे. दोरीमार्फत तिने सह्याद्रीचं अगस्त्य कुडम (Agasthya Koodam) शिखर तिने गाठलं आहे. अगस्त्य कुडम हे सह्याद्री पर्वत रांगांमधील सर्वात कठीण आणि उंच शिखरांपैकी हे एक शिखर आहे. जे 1868 मीटर उंचावर आहे.  केरळमध्ये हे सर्वात उंच दुसरं शिखर आहे. हे वाचा - VIDEO - रेल्वेचालकाने हद्दच केली; आपले चोचले पुरवण्यासाठी थांबवली ट्रेन आणि... व्हिडीओत पाहू शकता पर्वतावर खाली दोन तरुण उभे आहेत आणि या आजी आहेत. एरवी ट्रेकिंग किंवा रोप क्लाइंबिंग करायचं म्हणजे अनेकांना त्यासाठी खास कपडे, खास शूझ हवेत असतात. पण या आजी मात्र साडीतच दिसत आहेत. आपल्या साडीचा पदर खांद्यावरही घेऊन त्या रोप क्लाइम्बिंग करताना दिसत आहेत. पर्वतावरील दोर त्यांनी आपल्या हातात धरला आहे आणि त्या सरसर वर्वत चढत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Vishnu (@hiking_._)

  व्हिडीओत थोडं पुढे गेल्यावर एक व्यक्ती या शिखराजवळ उभी असलेली दिसते. आजी तिथपर्यंत पोहोचतात. त्या पर्वताचं शिखर गाठतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतो. पण या वयातही इतकं कठीण करतब करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा कुठेच नाही. त्यांना असं चढताना पाहून त्यांच्यासोबत असलेले तरुणही थक्क झाले. ते आजीला पाहतच राहिले. हे वाचा - स्कूटी शिकवणाऱ्या काकांनाच उडवलं; तरुणीचा Learning Video पाहून पोट धरून हसाल! हायकिंग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्मटध्ये दिलेल्या माहितीनुसार नागरत्नम्मा यांचा कर्नाटकच्या बाहेर हा पहिला प्रवास. त्यांच्या लग्नाला 40 वर्षे झाली. इतकी वर्षे त्या आपलं घर, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यात व्यक्त होत्या. आता मुलं मोठी झाली, आपल्या पायावर उभी राहिली, तसं त्या आपल्या इच्छा, आपली स्वप्नं साकार करण्यासाठी निघाल्या. बंगळुरूत त्या आपला मुलगा आणि त्यांच्या मित्रांसोबत आल्या.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Kerala, Viral, Viral videos

  पुढील बातम्या