मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हुश्शार अस्वल! कॅमेरा ऑन करू काढला स्वतःचा VIDEO; रेकॉर्डिंग पाहून व्हाल थक्क

हुश्शार अस्वल! कॅमेरा ऑन करू काढला स्वतःचा VIDEO; रेकॉर्डिंग पाहून व्हाल थक्क

अस्वलाला कोणाचातरी हरवलेला कॅमेरा सापडतो. कॅमेरा पाहताच अस्वल उत्सुकतेनं हा कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न करतं.

अस्वलाला कोणाचातरी हरवलेला कॅमेरा सापडतो. कॅमेरा पाहताच अस्वल उत्सुकतेनं हा कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न करतं.

अस्वलाला कोणाचातरी हरवलेला कॅमेरा सापडतो. कॅमेरा पाहताच अस्वल उत्सुकतेनं हा कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न करतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. प्राणीदेखील माणसांप्रमाणेच नवीन गोष्टी जाणून आणि समजून घेण्यासाठी उत्सुक असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ एका अस्वलाचा (Viral Video of Bear) आहे. यात या अस्वलाला कोणाचातरी हरवलेला कॅमेरा सापडतो. कॅमेरा पाहताच अस्वल उत्सुकतेनं हा कॅमेरा चालवण्याचा प्रयत्न करतं. इतकंच नाही तर ते स्वतःच कॅमेऱ्याचं बटन ऑन करतं आणि स्वतःचा व्हिडिओ काढतं (Bear Recorded his Video in Camera).

बाबो! कासव लय भारी! जंगलात पाणी पिणाऱ्या सिंहालाही लावलं पळवून; पाहा VIDEO

अस्वलाचा हा मजेशीर व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर, अनेकजण अस्वलाची हुशारी पाहून हैराण झाले आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ NE0NGENESlS नावाच्या यूजरनं अपलोड केला आहे. व्हिडिओ शेअर करत पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिलं, मित्रांनो, अस्वलाला एक गो प्रो आढळला आणि त्याने ऑन केला. याशिवाय हा व्हिडिओ आतापर्यंत 4.5 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. सोबतच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत तसंच हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक अस्वल वारंवार बर्फाच्या तुकड्यावर पडलेल्या कॅमेऱ्याला हात लावत आहे तसंच आपल्या तोंडाने त्याला स्पर्श करत आहे. हे पाहून असं वाटतं, की अस्वल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की हे नेमकं आहे काय. याच दरम्यान चुकून त्याच्याकडून कॅमेरा सुरू होतो आणि कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सुरू होते. यानंतर अस्वल कॅमेऱ्यात कैद होऊ लागतं. त्याचा हा स्वतःच शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीत अडकलं तरुणीचं डोकं

हा कॅमेरा नंतर एका व्यक्तीला सापडला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले गेलेले व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला अनुभव सांगत या व्यक्तीनं म्हटलं, की हा गो प्रो बऱ्याच काळापासून बर्फात पडला होता. अखेर मला हा कॅमेरा सापडला. मी हा कॅमेरा चार्ज केला आणि यानंतर यात मला जे काही दिसलं त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. चार महिने कॅमेरा तिथेच पडून राहिल्यानंतर एका मोठ्या काळ्या रंगाच्या अस्वलाला हा कॅमेरा सापडला. हे अस्वल केवळ कॅमेरा सुरु करून बसलं नाही तर त्यानं स्वतःचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला.. या व्हिडिओला आता नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media