जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिंस्त्र श्वापदं येतात. यामध्ये मग वाघ, चित्ता, बिबट्या यांच्यासोबतच जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचाही समावेश असतो. या सर्व जनावरांमुळे जंगलातील वातावरण अगदी भयानक होतं. असं असलं, तरी जंगलात कित्येक वेळा अगदी मजेशीर (Funny incidents in Jungle) गोष्टीही घडत असतात. वन विभागाचे अधिकारी, वाईल्डलाईफ फोटोग्राफर, किंवा डिस्कव्हरी सारख्या चॅनल्सच्या माध्यमातून आपल्याला जंगलातील असे मजेशीर व्हिडिओ (Funny wildlife videos) पहायला मिळतात. आताही जंगलातील एका सिंहाचा (Lion Turtle funny video) असाच एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होतो आहे. आपण लहानपणापासून हे ऐकत आलो आहोत, की सिंह जंगलाचा राजा आहे. आपण आतापर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये, डॉक्युमेंटरीजमध्ये किंवा कित्येकांनी तर प्रत्यक्षातही सिंहाला पाहिलं आहे. शरीराने मोठे असलेले प्राणीही सिंहाला घाबरून असतात, तिथे लहानग्या प्राण्यांचं काय बोलणार? अशाच एका एकदम खतरनाक सिंहाची चक्क छोट्याशा कासवाने पळता भुई (Turtle chasing lion video) थोडी केल्याचं कोणी तुम्हाला सांगितलं तर? नाही, ही पंचतंत्रमधील कथा नाही, तर खरोखरच घडलेली घटना आहे. या मजेशीर आणि अनोख्या घटनेचा व्हिडिओ (Lion Turtle viral video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून बरेच लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारतीय वन विभागातील अधिकारी सुशांत नंदा (Sushant Nanda twitter) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. काही तासांमध्येच या व्हिडिओला (Sushant Nanda lion video) हजारो व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्यात. टाइम्स नाऊ हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे या व्हिडिओत… या व्हिडिओमध्ये दिसून येतंय की एक मोठा सिंह नदीकाठी बसून आरामात पाणी पितो आहे. एवढ्यात नदीमधून एक छोटंसं कासव हळूच सिंहाच्या तोंडाजवळ (Turtle scares lion) येतं. या कासवाला पाहून सिंह चक्क घाबरतो आणि दचकून मागे हटतो. विशेष म्हणजे, या कासवाला घाबरून तो पाणी पिण्याची जागाही बदलून दुसरीकडे जातो. मजेची बाब म्हणजे, सिंह दुसरीकडे जात असताना कासव चक्क त्याच्या मागे (Small turtle chasing Lion) लागलं आहे. तर, हा जंगलाचा राजादेखील कासवाला घाबरुन मागे हटताना दिसतोय.
After taking the booster dose pic.twitter.com/bpJe72Ex95
— Susanta Nanda (@susantananda3) October 7, 2021
या सिंहाची झालेली फजिती नेटिझन्स अगदीच एन्जॉय करत आहेत. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लोक कमेंट करत आहेत. काही लोक या व्हिडिओला क्युट म्हणत आहेत, तर काही लोक या कासवाच्या हिमतीला दाद देत आहेत. एकंदरीत हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील असंच म्हणाल, की हा खरंच जंगलाचा राजा आहे का?