Home /News /viral /

VIDEO: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा अस्वलाचा महिलेवर हल्ला; पाहा कशी झाली अवस्था

VIDEO: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा अस्वलाचा महिलेवर हल्ला; पाहा कशी झाली अवस्था

एका अस्वलानं केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. हे अस्वल टोपी आणि स्कार्फ घालून रिंगमध्ये प्रवेश करतं आणि अचानक समोर उभा असलेल्या ट्रेनरवर हल्ला करतं.

    नवी दिल्ली 19 जुलै : जंगली प्राण्यांना कितीही ट्रेन केलं तरी अनेकदा ते आपलं मूळ रूप सोडत नाहीत. ते कधी काय करतील याचा काही नेम नाही. मग तुम्ही त्यांना सर्कसच्या प्राण्यांप्रमाणं शिकवलेलं असू किंवा घरात पाळीव प्राण्याप्रमाणं ठेवलेलं असू. याच गोष्टीचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ (Shocking Video Viral) नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका अस्वलानं (Bear Attack) जे काही केलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हे एका सर्कसमध्ये लोकांचं मनोरंजन करणारं अस्वल आहे. ज्यानं आपल्या ट्रेनरवरच हल्ला केला आहे. क्षणार्धात जमीनदोस्त झाली तीन मजली इमारत; पाहा भयानक घटनेचा LIVE VIDEO ही घटना रशियामधील आहे. इथे हरलेक्विन ट्रॅवलिंग सर्कसमध्ये (Harlequin Travelling Circus) एका अस्वलानं केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. हे अस्वल टोपी आणि स्कार्फ घालून रिंगमध्ये प्रवेश करतं आणि अचानक समोर उभा असलेल्या ट्रेनरवर हल्ला करतं. तो महिलेचे पाय आपल्या पंजानं पकडतो आणि तिला चावण्याचा प्रयत्न करतो. महिलेला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित असलेले इतर दोन ट्रेनर अस्वलाला दूर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीही अस्वल तिला सोडत नाही. मात्र, काही वेळानंतर या महिलेला अस्वलाच्या तावडीतून सोडवलं जातं. VIDEO : नवरीचा चेहरा पाहताच हादरला नवरदेव; वरमाळा फेकून देत काढला मंडपातून पळ हे सगळं इथेच संपत नाही. कारण इतकं सगळं होऊनही शो पुढेही सुरू राहतो. महिला ट्रेनर दुसऱ्यांदा पुन्हा या अस्वलासमोर परफॉर्म करण्यासाठी जाते आणि अस्वल पुन्हा तिच्यावर हल्ला करतं. दुसऱ्यांदा हल्ला होऊनही शो तसाच सुरू राहतो आणि सगळं ठरल्याप्रमाणं सुरू असतं. अशात हे अस्वल तिसऱ्यांदा पुन्हा हल्ला करतं. हे सर्व दृश्य पाहून सर्कस पाहण्यासाठी आलेल्या सर्वांनाच धक्का बसतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होऊनही सर्कसनं कोणताही हल्ला झाल्याच्या घटनेस नकार दिला आहे. या शोमध्ये कोणत्या नियमांचं उल्लंघन झालं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack, Shocking video viral

    पुढील बातम्या