मराठी बातम्या /बातम्या /Viral /याला म्हणतात नशीब! बाजारात फुगे विकायची तरुणी; एका फोटोनं रातोरात बदललं आयुष्य

याला म्हणतात नशीब! बाजारात फुगे विकायची तरुणी; एका फोटोनं रातोरात बदललं आयुष्य

या तरुणीचं नाव किसबू असं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाजारात फुगे विकणारी ही तरुणी आता मॉडेल बनली आहे.

या तरुणीचं नाव किसबू असं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाजारात फुगे विकणारी ही तरुणी आता मॉडेल बनली आहे.

या तरुणीचं नाव किसबू असं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाजारात फुगे विकणारी ही तरुणी आता मॉडेल बनली आहे.

नवी दिल्ली 15 मार्च : कोणाचं नशीब कधी बदलेल, हे सांगता येत नाही. नशीब अशी गोष्टी आहे, जे रातोरात एखाद्याला जमिनीवरुन अगदी आकाशाची उंची देतं, तर कधी धाडकन रातोरात जमिनीवर आपटतं. नशीब पालटल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. जेव्हापासून सोशल मीडियाचा वापर काढला आहे, तेव्हापासून तर अनेकांचं नशीबच बदललं आहे. मग तो पाकिस्तानातील चहा विक्रेता (Pakistani Tea Seller) असो किंवा भारतातील रानू मंडल (Ranu Mondal). नुकतंच कच्चा बदाम गाणं गाऊन एक शेंगदाणे विकणारा व्यक्तीही प्रसिद्धीझोतात आला आहे. अशात आता केरळमधील फुगे विकणारी एक तरुणी सध्या चर्चेत आली आहे (Social Media Star).

VIDEO: पाण्यातून बाहेर आल्याने मरणाच्या दारात पोहोचला मासा; कासवाने वाचवला जीव

फोटोग्राफीची ताकद कमी नसते. सोशल मीडियावर कधी कोणता फोटो लोकांच्या नजरेत बसेल आणि व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये चहा विकणारा अरशद खान रातोरात स्टार बनला होता. आता केरळमधील एक तरुणी या लिस्टमध्ये सामील झाली आहे. या तरुणीचं नाव किसबू असं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाजारात फुगे विकणारी ही तरुणी आता मॉडेल बनली आहे.

किसबू मुळची राजस्थानी कुटुंबातील आहे, मात्र केरळमध्ये फुगे विकण्याचं काम करते. काही दिवसांपूर्वी ती केरळच्या अंडलूर कावू फेस्टिव्हलमध्ये फुगे विकत होती. तिथे अर्जून कृष्णन नावाचा फोटोग्राफर गेला होता. अचानक त्याने किसबूला पाहिलं आणि तिचा फुगे विकतानाचा फोटो काढला. काही काळाने अर्जूनचा मित्र श्रेयसनेही तिचा फोटो क्लिक केला आणि शेअर केला. तो फोटोदेखील व्हायरल झाला.

टॅटूच्या नादात तरुणीच्या हाताची लागली वाट; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

किसबूचा फोटोजेनिक चेहरा त्यांनी या तरुणीशी संपर्क साधून फोटोशूटसाठी बातचीत केली. त्यांनी रेम्याद्वारे किसबूचा मेकओव्हर केला आणि तिचे फोटो क्लिक केले. या फोटोशूटला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि पाहता पाहता हे फोटो व्हायरल झाले. आता तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर आल्या आहेत. बघता बघता सोशल मीडियाने रातोरात तिचं आयुष्यच बदललं आहे.

First published:

Tags: Model, Viral photo