पियुष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 19 जून : 29 जूनला बकरी ईद साजरी होईल. त्यासाठी सर्वत्र विशेष तयारी सुरू आहे. बकऱ्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील एका बकऱ्याची तर संपूर्ण देशात चर्चा आहे. या बकऱ्याचं वजन तब्बल 150 किलोहून अधिक आहे. त्यामुळे अंगयष्टीने तो अगदी रुबाबदार दिसतो. शिवाय त्याच्या नावातही रुबाब आहे. त्याचं नाव आहे ‘राजा’. राजा इतर बकऱ्यांप्रमाणे केवळ चारा खात नाही, तर चाऱ्यासह दूध, लोणी, मटण, मच्छीदेखील खातो. त्याच्या मालकाने तर सर्वांना पैजच लावली आहे. माझ्या राजासारखा दुसरा बकरा अख्ख्या उत्तर प्रदेशातून शोधून आणा, मी तुम्हाला 5100 रुपयांचं बक्षीस देईन, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
असालतपूरातील रहिवासी मोहम्मद आलम उर्फ गुड्डू हे गेल्या अनेक वर्षांपासून बकऱ्यांचा व्यवसाय करतात. ते आपल्या बकऱ्यांची काळजी अगदी बाळाप्रमाणे घेतात, त्यांचे सर्व लाड पुरवतात. आज त्यांच्याजवळ 10 हजारांपासून साडे 7 लाखांचे बकरे आहेत. ड्रग अॅडिक्ट अन् घटस्फोटित होता अभिनेता; अभिनेत्रीनं आईवडिलांच्या विरोधात जाऊन केलं आंतरधर्मीय लग्न मोहम्मद आलम ईदसाठी मुंबई, पुणे, नाशिक, अजमेर इत्यादी शहरांमध्ये जाऊन बकऱ्यांची विक्री करतात. राजाची किंमत तब्बल 7,50,000 इतकी असून त्याच्यासारखा दुसरा बकराच नाही, असा त्यांचा दावा आहे.