नसिरुद्दीन शाह बॉलीवूडमधील जेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत, परंतु त्याच्या स्पष्ट विधानांमुळे ते नेहमीच अडचणीत येतात. पण त्यांना त्यांची पत्नी रत्ना पाठकचा नेहमीच पाठींबा मिळतो. नसीरुद्दीन शाह यांनी 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.
नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे दोघे लग्नापूर्वी 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. याविषयी बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही एकत्र राहत नव्हतो, पण एकमेकांवर प्रेम करत होतो. लग्नापूर्वी आम्ही 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पण तिचे आईवडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते.'
याचं कारण सांगत ते म्हणाले की, 'कारण मला अंमली पदार्थांचं व्यसन होतं आणि माझे यापूर्वी एकदा लग्न झालं होतं. मी घटस्फोटित असण्यासोबत माझा स्वभाव देखील रागीट होता.'
नसीरुद्दीन पुढे म्हणतात, 'रत्नाला पहिल्यांदा पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आम्ही भेटलो तेव्हा ती सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करत होती आणि मी एक चित्रपट केला होता. चांगल्या आणि वाईट काळात आम्ही एकमेकांना साथ दिली.'
नसीरुद्दीन आणि रत्ना यांचे नाते इतके घट्ट आहे कारण ते नेहमीच मित्र बनून राहिले. जवळपास 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर रत्ना आणि नसीरुद्दीन यांनी 2 एप्रिल 1982 रोजी लग्न केले.
अभिनेत्याला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, तिचे नाव हिबा शाह आहे. नसीरुद्दीन यांना रत्ना पाठकपासून इमाद शाह आणि विवान शाह अशी दोन मुले आहेत, दोघेही अभिनेते आहेत.
72 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांचा पहिला विवाह दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिक्रीची बहिण मनारा सिक्रीशी झाला होता, जी त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी होती. पण मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले.'
नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक या दोघांनी आज 40 वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत घालवला असून दोघेही सुखी संसार करत आहेत.