Home /News /viral /

आतापर्यंत 45 वेळा केलाय विमानानं प्रवास; महिन्याला 75 हजार रुपये कमवतं हे 1 वर्षाचं बाळ

आतापर्यंत 45 वेळा केलाय विमानानं प्रवास; महिन्याला 75 हजार रुपये कमवतं हे 1 वर्षाचं बाळ

या बाळाचं नाव ब्रिग्स आहे. केवळ एका वर्षाच्या वयातच त्यानं आतापर्यंत 45 फ्लाईट्सनं प्रवास केला आहे

  वॉशिंग्टन 21 ऑक्टोबर : आजच्या व्हर्चुअल जगात (Virtual World) इंटरनेट इन्फ्लूएन्सर (Internet influencer) प्रसिद्धी मिळवतात. आपल्या कामानं आणि बोलण्यानं ते लोकांचं लक्ष वेधतात. लाखो करोडो लोक त्यांचं बोलणं ऐकतात आणि त्यांना फॉलो करतात. अशाच या व्हर्चुअल जगात एका एक वर्षाच्या बाळानंही (Baby Influencer) आपलं स्थान निर्माण केलं आहे. हा मुलगा जगभरात फिरतो आणि दर महिन्याला जवळपास एक हजार डॉलर म्हणजेच 75 हजार रुपये कमवतो. घराच्या पोटमाळ्यावरुन रोज रात्री यायचे विचित्र आवाज; सत्य समजताच हादरलं कपल डेली मेलच्या वृत्तानुसार, या बाळाचं नाव ब्रिग्स आहे. केवळ एका वर्षाच्या वयातच त्यानं आतापर्यंत 45 फ्लाईट्सनं प्रवास केला आहे. अलास्कार, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, उटाह, आयडहोसह अमेरिकेच्या 16 राज्यांत तो फिरला आहे. ब्रिग्सची आई जेस हिनं सांगितलं, की त्याचा जन्म मागील वर्षी 14 ऑक्टोबरला झाला. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतरच तो आपल्या पहिल्या ट्रिपसाठी गेला. त्यानं अलास्कामध्ये अस्वलही पाहिले आहेत. यलोस्टोन नॅशनल पार्कमधील लांडगे आणि उटाहमधील डेलीकेट आर्क आणि कॅलिफोर्नियात बीचचा आनंदही घेतला आहे.
  ब्रिग्सचे इन्स्टाग्रामवर 30 हजार फॉलोअर्स आहेत. त्याची आई आधीपासूनच पार्ट टाईम टूरिस्ट नावाचा ब्लॉग चालवते. तिचे सर्व प्रवास पेड असतात. म्हणजेच तिला ट्रॅव्हलिंगचे पैसे मिळतात आणि ती रिव्ह्यू लिहिण्याचं काम करते. तिनं सांगितलं, की जेव्हा 2020 मध्ये ती गरोदर होती तेव्हा खूप चिंतेत होती. तिला असं वाटलं होतं की आता तिचं करिअर संपेल. मात्र, ब्रिग्सच्या जन्मानंतर तिनं एक नवी उंची गाठली. कोणी बोनेटवर तर कोणी समोर; सिंहांनी चारचाकीला घेरलं अन्..; धडकी भरवणारा VIDEO तिनं सांगितलं, की माझ्या पतीची अशी इच्छा आहे, की मी काम करत राहावं. यामुळे मी बेबी ट्रॅव्हलबद्दल एक सोशल मीडिया अकाऊंट बनवलं. मला या क्षेत्रात भरपूर संधी दिसली. मी माझ्या बाळासोबत प्रवास करते आणि याचे अनुभव इथे सांगते. यामुळे आपल्या बाळांसोबत प्रवास करण्याची इच्छा असलेल्या अनेक पालकांना प्रेरणा मिळते.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Influencer, Social media

  पुढील बातम्या