मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे झाला मोठा खुलासा

44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे झाला मोठा खुलासा

शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झालं की हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार (Rape) केला गेला होता. पोलिसांना कारच्या सीटवर संशयित आरोपीचे काही केस आणि त्वचेचा काही भाग आढळला

  • Published by:  Kiran Pharate

वॉशिंग्टन 18 जुलै : 44 वर्षांपासून रहस्यमय असलेल्या एका हत्येचं (Murder) गूढ उलगडण्यात अखेर यश आलं आहे. हे शक्य झालं घटनास्थळी मिळालेल्या आरोपीच्या DNA सँपलनं. याच आधारे अखेर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत. ही घटना अमोरिकेमधील (USA) आहे. सीबीएस लोकल डॉट कॉमच्या वृत्तानुसार, 19 डिसेंबर 1976 मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California) नर्सिंगची 19 वर्षीय विद्यार्थीनी जेनेट स्टॉलकप (Janet Stallcup) हिची हत्या (Murder) झाली होती.

हत्या झाली त्यादिवशी ती आपल्या एका मित्राच्या घरी पार्टीसाठी गेली होती. मात्र, यानंतर ती गाडीसह बेपत्ता झाली होती. जवळपास एका आठवड्यानंतर तिचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर आढळला होता. तिची हत्या गळा दाबून केली गेली होती. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झालं की हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार (Rape) केला गेला होता. पोलिसांनी कारच्या सीटवर संशयित आरोपीचे काही केस आणि त्वचेचा काही भाग आढळला. हे सर्व फॉरेन्सिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवलं गेलं.

आई-लेकीने सुपारी देऊन पोलीस हवालदार असलेल्या वडिलांचा गळा चिरला, गडचिरोली हादरलं

हॉकिन्सच्या मृत्यूपर्यंत त्याच्यावर सुनावणी सुरू होती मात्र त्याला आरोपी घोषित केलं गेलं नव्हतं. त्याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण थांबलं आणि तरुणीची हत्या कोणी केली हा प्रश्न फाईलमध्येच बंद झाला. याप्रकरणी खुलासा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले गेले मात्र काहीही समोर आलं नाही. अखेर या हत्येचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी 2002 मध्ये घटनास्थळी आढळलेल्या स्वॅबमधून जेनेटिक मटेरिअल वेगळं केलं. हे सँपल वेगवेगळ्या संशयितांसोबत मिळवले गेले मात्र काहीही फायदा झाला नाही. अखेर पोलिसांनी Terry Dean Hawkins याच्या एका जवळच्या नातेवाईकाचं DNA सँपल घेण्याचा निर्णय घेतला.

हत्येचा सूड उगविण्यासाठी पत्नीचा मास्टरप्लान; खूनी योजना पाहून पोलीसही चक्रावले

या नातेवाईकानं आपलं सँपल दिलं आणि पोलिसांनी हे सँपल घटनास्थळी मिळालेल्या जेनेटिक मटेरिअलसोबत मॅच करून पाहण्यासाठी लॅबमध्ये पाठवलं. पोलीस तेव्हा हैराण झाले जेव्हा दोघांचे नमुने मॅच झाले. याचा अर्थ सरळ असा होता, की 44 वर्षाआधी Janet Stallcup हिची हत्या Terry Dean Hawkins यानंच केली होती.

First published:

Tags: Cyber crime, Murder Mystery, Rape