त्यामुळे सर्पमित्रांनी या नागिणीला वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षित ठेवले होते. याठिकाणी या नागिणीने 13 अंडी घातली. यानंतर या नागिणीला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. भारतात दिसला गोल्डन टायगर, सर्वात दुर्मीळ असलेल्या वाघिणीचे PHOTO VIRAL सुमारे दीड महिना या अंड्याची कृत्रिम रीतीने जोपासना करण्यात आली होती. आज या सर्व अंड्यातून नागाची पिल्ले बाहेर निघाली. लवकरच या पिल्लांना देखील जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्प मित्र सुहास पवार यांनी सांगितलं. कोब्रा जातीच्या सापाने क्रोबाला गिळले दरम्यान, मागील आठवड्यात कोब्रा नागाचा पु्ण्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. भुकेल्या स्पेक्टिकल कोब्रा(नाग) या जातीच्या विषारी सापाने त्याच जातीच्या सापाला भक्ष बनवून गिळल्याचा व्हिडिओ समोर आला. पुणे येथील सिंहगड पायथ्याशी काही सर्प मित्रांनी हा व्हिडिओ काढला होता. या व्हिडिओमध्ये एका सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळल्याचं या व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे. जेव्हा या मोठ्या सापाने गिळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा या लहानश्या सापाने फारसा प्रयत्न केला नाही. पण, जेव्हा आता आपण पूर्णपणे या सापाच्या पोटात जाणार आहोत, हे समजल्यावर तोंडाशी आल्यावर या लहान सापाने मोठ्या सापाच्या तोंडाला चावा घेतला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने या लहान सापाने सापाला जोरात हल्ला केला. पण मोठ्या सापाच्या तावडीतून याची काही सुटका झाली नाही. अखेर या मोठ्या सापाने पूर्णपणे साप गिळला. भुसावळमध्ये भर रस्त्यावर आले नाग-नागिणी, पाहा हा VIDEO पण म्हणता ना, लहान तोंडी मोठा घास कधी घेऊ नये, असाच काहीसा प्रकार या सापासोबत झाला. मोठ्या सापाने लहान सापाला गिळल्यानंतर पचवू शकला नाही, तेव्हा त्याने या सापाला बाहेर काढलं.एक नाही तब्बल 13 नागाच्या पिल्लांचा जन्मसोहळा, कल्याणमधला व्हिडिओ pic.twitter.com/DtCMaWY8hS
— News18Lokmat (@News18lokmat) July 13, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.