भारतात दिसला गोल्डन टायगर, सर्वात दुर्मीळ असलेल्या वाघिणीचे PHOTO VIRAL

भारतात दिसला गोल्डन टायगर, सर्वात दुर्मीळ असलेल्या वाघिणीचे PHOTO VIRAL

गोल्डन टायगर किंवा गोल्डन टॅबी टायगर हा रॉयल बंगाल टायगरचा एक दुर्मीळ प्रकार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : वाघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पिवळा रंग आणि त्याच्या अंगावर काळे पट्टे अशी कल्पना डोळ्यासमोर येते. पण जगात सोनेरी रंगाचा वाघ असू शकतो अशी कधी कल्पना केली होती का? चक्क सोनेरी आणि पांढरा रंग असलेल्या वाघाचे फोटो समोर आले आहेत.

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. 21 व्या शतकातील ही एकमेव गोल्डन टायगर (मादी) आहे. या वाघिणीची कागदपत्रांमध्ये नोंदली गेली आहे. आता या अत्यंत दुर्मिळ वाघाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. बरेच लोक हे प्रथमच पहात आहेत आणि त्याच्या सौंदर्य आणि वैशिष्ट्याचं कौतुक करत आहेत.

वाइल्डलाइफ फोटोग्राफर Mayuresh Hendre याने भारतात असलेल्या जगातील एकमेव गोल्डन टायगर (वाघिणी) फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. हे फोटो आसाममधील काजीरंगा नॅशनल पार्कमधील आहेत.

कसवानने गोल्डन टायगरची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोला 12 हजाराहून अधिक लाईक्स आणि 2 हजारांहून अधिक रिट्वीट केलं आहे. गोल्डन टायगर किंवा गोल्डन टॅबी टायगर हा रॉयल बंगाल टायगरचा एक दुर्मीळ प्रकार आहे. अशी माहिती प्रवीण कासवान यांनी दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 13, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading