भुसावळ, 10 जुलै : पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी सर्पदर्शन होत असते. भुसावळ शहरातील मोरेश्वर नगर भागात नाग-नागिणीच्या प्रणयाचा व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे. मोरेश्वर नगर भागात भर रस्त्यावर नाग आणि नागिणीचे एकत्र दर्शन झाले. नाग-नागिणीची प्रणयक्रीडा बऱ्याच वेळ सुरू होती. त्यानंतर ते दोघे रस्त्यालगतच्या नाल्यात गेले. त्यामुळे रस्ता हा वाहतुकीसाठी मोकळा झाला. पावसाळा हा सापांना प्रणय क्रीडा करण्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. पावसाळ्यात मोकळ्या जागी येऊन साप प्रणयक्रीडा करतात, असं जाणकारांचं मत आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रतीक्षेनंतर सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे सापांच्या प्रजाती गरमीने बेहाल होऊन पाऊस कधी पडेल याची वाट पाहतात. हे साप पावसाळा सुरू होताच मोकळ्या जागेत थंडीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून बिळातून बाहेर पडतात आणि प्रणय क्रीडा करतात. सापाने गिळले सापाला भुकेल्या स्पेक्टिकल कोब्रा(नाग) या जातीच्या विषारी सापाने त्याच जातीच्या सापाला भक्ष बनवून गिळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे येथील सिंहगड पायथ्याशी काही सर्प मित्रांनी हा व्हिडिओ काढला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हिडिओमध्ये एका सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळल्याचं या व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे. जेव्हा या मोठ्या सापाने गिळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा या लहानश्या सापाने फारसा प्रयत्न केला नाही. पण, जेव्हा आता आपण पूर्णपणे या सापाच्या पोटात जाणार आहोत, हे समजल्यावर तोंडाशी आल्यावर या लहान सापाने मोठ्या सापाच्या तोंडाला चावा घेतला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने या लहान सापाने सापाला जोरात हल्ला केला. पण मोठ्या सापाच्या तावडीतून याची काही सुटका झाली नाही. अखेर या मोठ्या सापाने पूर्णपणे साप गिळला.
पण म्हणता ना, लहान तोंडी मोठा घास कधी घेऊ नये, असाच काहीसा प्रकार या सापासोबत झाला. मोठ्या सापाने लहान सापाला गिळल्यानंतर पचवू शकला नाही, तेव्हा त्याने या सापाला बाहेर काढलं. लहान साप दुसऱ्या सापाच्या तोंडून जेंहा बाहेर पडला तेव्हा जिवंत होता. त्यानंतर सर्पमित्रांनी या दोन्ही सापाला वेगवेगळे करून सुखरुपपणे जंगलात सोडून दिले.