जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि... VIDEO व्हायरल

Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि... VIDEO व्हायरल

Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि... VIDEO व्हायरल

मुंबई 14 सप्टेंबर : सोशल मीडियावरील व्हिडीओ हे बऱ्याचदा आपलं मनोरंजन करतात. तर कधी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तसे काही असे व्हिडीओ देखील आहेत जे आपल्या समोर उदाहरण म्हणून समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे, जो नकळत घडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सावध व्हा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. बऱ्याचदा लोक सुट्टीच्या दिवशी आपली वाहानं स्वच्छ करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 14 सप्टेंबर : सोशल मीडियावरील व्हिडीओ हे बऱ्याचदा आपलं मनोरंजन करतात. तर कधी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तसे काही असे व्हिडीओ देखील आहेत जे आपल्या समोर उदाहरण म्हणून समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे, जो नकळत घडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सावध व्हा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. बऱ्याचदा लोक सुट्टीच्या दिवशी आपली वाहानं स्वच्छ करतात. तर बऱ्याचदा छोट्या-मोठ्या गोष्टी ते स्वत: दुरुस्त करतात. एक व्यक्ती असंच आपल्या घराबाहेर कार दुरुस्त करत होता. तेव्हा त्याची कार सुरु झाली आणि ज्यामुळे त्याचा अपघात घडला. हे वाचा : Video : रेल्वे फाटक बंद असताना ही त्यानं ते ओलांडलं, भरधाव ट्रेनलाही नाही जुमानलं अखेर… धक्कादायक व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की एका व्यक्तीला एका ऑटोमॅटीक कारने धक्का दिला ज्यामुळे समोरील शटरवर आदळली, तसेच ती व्यक्ती कार आणि या शटरच्यामध्ये पूर्णपणे अडकली . या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना कधी आणि कुठे घडली हे कळू शकलेले नाही. हे वाचा : ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, त्याला बायको आणि ट्रांसजेंडर दोघांशी थाटायचा होता संसार कारण… हा माणूस आपल्या कारचं बोनेट उघडून काही तरी करत करतो, तेव्हा तो पुन्हा ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. काही सेकंदांनंतर तो माणूस पुन्हा इंजिनजवळ येतो, ज्यानंतर कार अचानक सुरू होते आणि या माणसाला आदळते. यादरम्यान तेथे उपस्थित असलेली एक महिला आणि दुसरा पुरुष त्या माणसाला सोडवण्यासाठी स्टीलच्या शटरकडे धावताना दिसत आहेत.

जाहिरात

हा व्हिडीओ @ragiing_bull नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘एखादे ऑटोमॅटिक वाहन बिघडले तर कधीही वाहनासमोर उभे राहू नका. कृपया आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना चेतावणी द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात