आसाम 13 सप्टेंबर : कोणती बायको असो तिला आपल्या नवऱ्याला कोणासोबतही शेअर करायचं नसतं आणि ती आपल्या नवऱ्याला याची कधीही संमती देत नाही. ज्यामुळे अनेकदा नातं तुटणं किंवा घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात. परंतू सोशल मीडियावर एक अशी बातमी समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. ही बातमी सोशल मीडियावर खूपच ट्रेंड होऊ लागली आहे, तसेच यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थीत होऊ लागले आहेत. खरंतर एका नवऱ्याचं विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरु होतं, ज्याची महिती त्याच्या बायकोला मिळताच, त्याच्या बायकोनं यासाठी कोणताही आक्षेप घेतला नाही, उलट ती आपल्या नवरा आणि त्याच्या प्रेयसीसोबत एकाच घरात राहण्यासाठी तयार झाली. हे सगळं पण ठिक आहे, परंतू धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे, कारण या नवऱ्याला कोणत्याही महिलेशी नाही तर एका ट्रांसजेंडरवर जीव जडला होता. हो तुम्ही बरोबर ऐकलंत, हा पुरुष लग्न झालं असतानाही एक ट्रांसजेंडरसोबत एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होता. जे त्याच्या पत्नीनेही मान्य केले आहे आणि लग्नाला परवानगी दिली आहे. हे प्रकरण आसाम मधील असल्याचं समोर आलं आहे. परंतू आता प्रश्न असा उभा राहतो की, हे कायदेशीर रित्या मान्य आहे का? किंवा कायदा अशा लग्नाला मान्यता देतं का? खरंतर कायदेशीररित्या एखादी व्यक्ती पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरे लग्न करू शकत नाही. परंतू रविवारी या महिलेच्या नवऱ्याने ट्रांसजेंडरसोबत लग्न केले. यावेळी किन्नर समाजाचे लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेबकरी किन्नर महासंघाच्या अध्यक्षा कामिनी यांनी लग्नाचे सर्व विधी पार पाडले. कामिनी म्हणाल्या की, हिंदू विवाह कायद्यानुसार पुरुषाला एक पत्नी असताना दुसरे लग्न करता येत नाही, हे आम्हाला माहीत आहे. पण नवरा-बायको दोघांच्या संमतीने हे लग्न झालं आहे, त्यामुळे ते एकत्र राहात आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, या विवाहाबाबत कोणत्याही बाजूने आक्षेप किंवा तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. तो पर्यंत आम्ही देखील काहीही करु शकत नाही लग्नाला कायदेशीर मान्यता मिळेल का? तज्ञ काय म्हणतात पहिलं लग्न तुटत नाही, तोपर्यंत दुसऱ्या लग्नाला परवानगी देता येणार नाही, असे एका वकिलाने सांगितले. परंतू तरी देखील कोणी अशापद्धतीने लग्न करत असतील तरी त्या दुसऱ्या बायकोला कायद्यानं कोणतेही हक्क नाहीत, हे विवाहबाह्य संबंध किंवा लिव्ह इन रिलेशनशिप म्हणूनच ओळखलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.