कॅनबेरा, 23 नोव्हेंबर : देव, आत्मा, भूत (Ghost video) यावर काही लोक विश्वास ठेवतात तर काही नाही. विश्वास असो वा नसो तरी हॉरर फिल्म (Horror film), सीरिअल (Horror serial) किंवा व्हिडीओ (Horror video) पाहायला बहुतेकांना आवडतं आणि ते पाहताना घामही फुटतो. असाच एक शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात चक्क एका कुत्र्याचं भूत (Dog ghost video) दिसल्याचा दावा केला जातो आहे.
आतापर्यंत माणसांचं भूत तुम्ही पाहिलं असेल (Real ghost video). असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. पण कधी कोणत्या प्राण्याचं भूत पाहिलं आहे का? हा व्हिडीओ पाहा यात एका प्राण्याचं भूत दिसल्याचं सांगितलं जातं आहे. एका जिवंत कुत्र्यासोबत एक पारदर्शी कुत्रा खेळताना दिसला. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक काळा एका धूसर आकृतीचा पाठलाग करताना दिसतो आहे. ही आकृती कुत्र्याचीच आहे. काळा कुत्रा स्पष्टपणे दिसतो आहे. पण दुसरा कुत्रा हा थोडा विचित्रच दिसतो आहे. तो पारदर्शी, धूसर असा दिसतो आहे.
हे दृश्य ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील आहे. जेक डिमार्को (Jake DeMarco) नावाच्या व्यक्तीच्या बॅकयार्डमध्ये हे कुत्रे खेळताना दिसले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. या व्हिडीओत दिसणारा काळा कुत्रा हा जेकचा पाळीव कुत्रा आहे. त्याच्यासोबत खेळणारा पारदर्शी कुत्रा म्हणजे कुत्र्याचं भूत असावं, असा दावा जेकने केला आहे.
हे वाचा - Oh no! माशांना तोंडाने भरवण्याची हौस पडली भारी; तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO
जेक डिमार्कोने सांगितलं, त्याच्या बॅकयार्डचं फेन्सिंग खूप उंच आहे. त्यामुळे बाहेरील कोणताही प्राणी आत येणं कठीण आहे. तसंच आपल्या कुत्र्यासोबत दुसरा कुत्रा दिसताच तो लगेच धावत बॅकयार्डमध्ये पोहोचला पण त्याला दुसरा कोणताच कुत्रा दिसला नाही.
हे वाचा - आलं अंगावर घेतलं शिंगावर! सिंहाला रेड्याने हवेत गरागरा फिरवलं; खतरनाक VIDEO
आता तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहा आणि पारदर्शी दिसणारा हा कुत्रा म्हणजे जिवंत पांढरा कुत्रा आहे की कुत्र्याचं भूत हे तुम्हीच सांगा. आमच्या सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pet animal, Shocking viral video, Viral, Viral videos