मराठी बातम्या /बातम्या /Viral /ग्वालियरमध्ये केजरीवाल विकतायत चाट? Video Viral होताच सर्वांना बसला धक्का

ग्वालियरमध्ये केजरीवाल विकतायत चाट? Video Viral होताच सर्वांना बसला धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

एका फूड व्लॉगरने याचा व्हिडीओ शूट केला आणि तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : असे मानले जाते की जगात एकसारखे दिसणारे सात चेहरे असतात. सामान्य लोकांचे लुक लाईक सहसा पाहायला मिळत नाही. पण लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांचा विचार केला जातो तेव्हा त्यांचे लुक लाइक्स पाहणे नेहमीच मनोरंजक असते. असे एक ना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. ही व्यक्ती अगदी हुबेहुब कजरीवाल यांच्यासारखी दिसत आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी त्या व्यक्तीसोबत आपले फोटो काढले आहे.

हे ही पाहा : ड्यूटीच्या वेळी झोपला कॉनस्टेबल, रंगेहात पडताच दिलं असं कारण, ऐकून वाटेल आश्चर्य

एका फूड व्लॉगरने याचा व्हिडीओ शूट केला आणि तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले.

जेव्हा व्हिडीओ सुरू होतो, तेव्हा तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या कडेला त्याच्या दुकानात एक विक्रेता उभा आहे, जो अरविंद केजरीवालसारखा दिसतो आणि मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातील रस्त्यावर स्वादिष्ट चाट विकतो. अरविंद केजरीवाल सारख्या दिसणाऱ्या या दुकानदाराने पांढरी टोपी घातली आहे.

यासोबतच दिल्लीचे सीएम केजरीवाल अनेकदा ते परिधान करतात, अशा पद्धतीने ड्रेसिंगही करण्यात आली आहे. चष्मा, टोपी आणि स्वेटरच्या संयोजनाने बऱ्याच लोकांना गोंधळात टाकले आहे.

View this post on Instagram

A post shared by vishal sharma (@foodyvishal)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये व्लॉगरने म्हटले आहे की, "दिल्लीच्या केजरीवाल यांनी बरेच काही मोकळे ठेवले आहे, तर ग्वाल्हेरचे केजरीवाल गुणवत्तेवर विश्वास ठेवतात." याला उत्तर देताना, केजरीवाल यांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने हसून सांगितले की, तो ग्वाल्हेरमध्ये उत्तम दर्जाची चाट विकतो, ते ही स्वस्त दरात.

त्याने झाडाच्या फांदीवर चिकटवलेले मेन्यू कार्ड दाखवले, त्यात 'समोसा' आणि 'कचोरी'ची किंमत फक्त 10 रुपये आहे, तर दही भल्ला, मटर कचोरी, पालक चाट याची किंमत 20 रुपये आहे. या व्हिडीओला लोकांनी देखील भरभरुन पसंती दर्शवली आहे.

First published:

Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral