मराठी बातम्या /बातम्या /Viral /ड्यूटीच्या वेळी झोपताना पकडला गेला, दिलेलं कारण वाचून थांबणार नाही हसू

ड्यूटीच्या वेळी झोपताना पकडला गेला, दिलेलं कारण वाचून थांबणार नाही हसू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

त्यांनी टीम कमांडरला स्पष्टीकरण देण्यासाठी एक पत्र लिहिलं. पण ते इतकं मनोरंजक आहे की, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ 13 ऑक्टोबर : आपल्या सुरक्षेसाठी पोलिस नेहमीच तैनात असतात. आपल्याला सणासाठी सुट्टी असली, तरी देखील त्यांना मात्र काम करावेच लागते, उलटं त्या दिवशी त्यांना जास्तच काम असतं. तेव्हाच तर आपण सण चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने साजरा करु शकतो. पण किती झालं तरी देखील ते माणूसच आणि माणसांना सहाजिकच थकवा जाणवू शकतो.

उत्तर प्रदेशातून याच संबंधीत एक बातमी समोर आली आहे. सुलतानपूर येथे प्रशिक्षणादरम्यान झोपेत सापडलेल्या हेड कॉन्स्टेबलला जेव्हा स्पष्टीकरण विचारण्यात आले तेव्हा त्याने जे कारण सांगितलं ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हे ही वाचा : बिअर पिऊन मुलांना शिकवत होता शिक्षक, Viral Video पाहून लोकांकडून संताप व्यक्त

हेड कॉन्स्टेबल राम शरीफ यादव हे सोमवारी प्रशिक्षण वर्गादरम्यान झोपलेले होते. ड्यूटी दरम्यान ते झोपले होते आणि हा घोर निष्काळजीपणा आहे, असं मानून पीटीसीच्या टीम कमांडरने हेड कॉन्स्टेबलकडून स्पष्टीकरण मागितले होते.

मात्र राम शरीफ यांच्या स्पष्टवक्तेपणाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी टीम कमांडरला स्पष्टीकरण देण्यासाठी एक पत्र लिहिलं. पण ते इतकं मनोरंजक आहे की, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : विमानात हाय व्होल्टेज ड्रामा, प्रवाशाने पकडला मुलीचा हात आणि...

हेडकॉन्स्टेबल राम शरीफ यादव लिहिले आहे की, ते लखनौहून पीटीसी दादुपूरला प्रशिक्षणासाठी निघाला होता. त्याला इथे येताना खूप त्रास झाला. संध्याकाळी थकून ते पीटीसीला पोहोचले होते. त्यांनी पुढे लिहिले आहे की, योग्य आहार न मिळाल्याने त्यांचे पोट भरत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी 25 रोट्या, एक प्लेट भात आणि एक वाटी भाजी खाल्ली. यामुळे ते सुस्तावले आणि त्यामुळे त्यांना झोप आली.

गंमत म्हणजे पुढच्या वेळेपासून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा खाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. ज्यासाठी त्यांनी माफीही मागितली आहे.

आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात हे पत्र व्हायरल होत आहे. आता यावर लोक यावर तीव्रपणे आपले मत व्यक्त करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Social media, Top trending, Viral