मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या चपलेसाठी कित्येक लोक रांगेत, लाखो रुपये द्यायला तयार; काय आहे यात इतकं खास पाहा

या चपलेसाठी कित्येक लोक रांगेत, लाखो रुपये द्यायला तयार; काय आहे यात इतकं खास पाहा

ही अशी तुटलेली, जुनी चप्पल जिचा लिलाव केला जातो आहे आणि लाखो रुपयांची बोलीही लागली आहे.

ही अशी तुटलेली, जुनी चप्पल जिचा लिलाव केला जातो आहे आणि लाखो रुपयांची बोलीही लागली आहे.

ही अशी तुटलेली, जुनी चप्पल जिचा लिलाव केला जातो आहे आणि लाखो रुपयांची बोलीही लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 12 नोव्हेंबर : तुम्ही या चपला पाहिल्यात ना? अशा चपला तुम्ही विकत घ्याल? हल्ली तर इतक्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतींच्या चपला मिळतात की, या चपला कुणी का विकत घेईल. पण तुम्हाला माहितीये याच चपलांसाठी लोक लाखो रुपये द्यायला तयार आहेत. या चपलांसाठी लोक रांगेत आहेत. या चपलांमध्ये इतके विशेष काय? तर या चपला आहेत अ‍ॅप्पल कंपनीचे को-फाउंडर स्टीव्हन जॉब्स यांच्या.

स्टीव्हन पॉल जॉब्स यांचे 2011 मध्ये निधन झाले. परंतु त्यांनी एवढी मोठी कंपनी मागे सोडली आहे, ज्याचा गाजावाजा संपूर्ण जगात आहे. स्टीव्ह जॉब्स हे अ‍ॅप्पल कंपनीचे सह-संस्थापक होते. ज्यांच्यामुळे अ‍ॅप्पल आजच्या काळात आयफोन मोबाईलच्या बाबतीत आघाडीचा ब्रँड बनला आहे. एकीकडे जगाला त्यांच्या बुद्धीमत्तेने प्रभावित होती. तर दुसरीकडे लोकांना त्यांच्या साधेपणाचेही वेड लागले होते.

VIDEO - तपत्या लोखंडी गोळ्याचा केला बॉल आणि हवेत मारला शॉट; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

स्टीव्हन पॉल जॉब्स यांच्या जुन्या सँडलचा म्हणजेच चपलेचा (Steve Jobs sandal auction) लिलाव होत आहे. हा लिलाव 11 नोव्हेंबर पासून 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. स्टीव्हन पॉल जॉब्स यांच्या चपला दिसायला त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारख्याच अगदी सध्या आहे. परंतु या ऑक्शनमध्ये त्यांच्या चपलांच्या किंमतीचा अंदाज लावणे तुम्हाला अशक्य होईल. ही चप्पल अगदी साधी तपकिरी रंगाची आहे.

NDTV च्या वृत्तानुसार, स्टीव्ह जॉब्स यांच्या तपकिरी रंगाच्या लेदरच्या बर्किन्सटॉक ऍरिझोना सँडलचा ज्युलियन्स ऑक्शन्सद्वारे लिलाव सुरु केला गेला आहे. सँडलसोबतच सँडलचा एनएफटी फोटो आणि फोटोग्राफर जीन पिगोझीच्या पुस्तकाचाही लिलाव होत आहे. या पुस्तकाचे नाव 'The 213 Most Important Men in My Life' असे आहे, यामध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या नावाचाही समावेश आहे.

64 लाखांपर्यंत कमावण्याची आहे योजना

या चपलांच्या माध्यमातून 48 लाख रुपयांपासून 64 लाख रुपये उभारले जातील, असा लिलाव करणाऱ्यांचा विश्वास आहे. हा लिलाव 11 नोव्हेंबर पासून 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. NDTV च्या रिपोर्टनुसार, स्टीव्ह जॉब्स यांनी 1970 ते 1980 च्या दरम्यान ही चप्पल घातली होती. स्टीव्ह जॉब्स यांच्या घराच्या व्यवस्थापकाकडे अजूनही या सँडल होत्या. स्टीव्ह जॉब्स यांची एक्स वाइफ क्रिसन ब्रिनन यांनी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या चपला त्यांच्या साध्या जीवनाचा भाग आहेत. या त्यांच्या गणवेशासारख्या आहेत.

अशी दिसत होती जगातील पहिली प्रेग्नंट 'ममी'; 2 हजार वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू

18 लाखांपर्यंत बोली

स्टीव्हन यांच्या पत्नीने मुलाखतीत हेही सांगितले की, 'स्टीव्हने इतरांपासून चांगले किंवा वेगळे दिसण्यासाठी कधीही महागड्या वस्तू खरेदी केल्या नाहीत. त्यांना या चपला यामुळे आवडायच्या, कारण या घातल्यावर त्यांना बिझनेसमॅन सारखे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांना चांगले विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळायचे.' रिपोर्टनुसार, लिलाव 12 लाख रुपयांपासून सुरू झाला आणि 18 लाख रुपयांच्या दोन बोली लावल्या गेल्या.

First published:

Tags: Apple, Lifestyle, Viral