मराठी बातम्या /बातम्या /Viral /रहस्यमयी! या जंगलात गेलेलं कोणीच परत येत नाही; आत जाताच आत्महत्या करतात लोक

रहस्यमयी! या जंगलात गेलेलं कोणीच परत येत नाही; आत जाताच आत्महत्या करतात लोक

आओकीगाहरा जंगलात (Aokigahara Forest) अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या जंगलात जितके लोक येतात, त्यातील बहुतेक लोक इथेच भटकतात आणि आपला जीव देतात (Suicide Forest) .

आओकीगाहरा जंगलात (Aokigahara Forest) अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या जंगलात जितके लोक येतात, त्यातील बहुतेक लोक इथेच भटकतात आणि आपला जीव देतात (Suicide Forest) .

आओकीगाहरा जंगलात (Aokigahara Forest) अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या जंगलात जितके लोक येतात, त्यातील बहुतेक लोक इथेच भटकतात आणि आपला जीव देतात (Suicide Forest) .

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : जंगालत हिरवीगार झाडं आपल्याला जितकं आकर्षित करतात तितकीच रहस्य या जंगलांमध्ये लपलेली असतात. जपानची राजधानी टोक्योपासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या आओकीगाहरा जंगलातही (Aokigahara Forest) अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या जंगलात जितके लोक येतात, त्यातील बहुतेक लोक इथेच भटकतात आणि आपला जीव देतात (Suicide Forest).

जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म

जगातील विचित्र जागांमधील (Weird Places of World) एक असलेलं हे जंगल ‘सुसाइड फॉरेस्ट’ (Suicide Forest) या नावानं प्रसिद्ध आहेत. याठिकाणी आतापर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येच्या अनेक घटना ऐकल्यानं आणि पाहिल्याने इथल्या लोकांनी या जागेला भूतांचा अड्डा (Ghosts in Japanese Jungle) म्हणण्यास सुरुवात केली आहे.

या जंगलात प्रवेश करण्याआधी तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल आणि मुलांबद्दल नक्की विचार करायला हवा. तुमचं जीवन तुमच्या आई-वडिलांनी दिलेलं मौल्यवान गिफ्ट आहे, असे बोर्ड तिथे लावले जातात. जपानच्या टोक्योपासून २ तासाच्या अंतरावर असलेलं हे जंगल 35 वर्ग किलोमीटरवर पसरलेलं आहे (Suicide Forest in Japan). या जंगलात लोक हरवतात. या जंगलातील माती ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून बनली आहे. याच कारणामुळे इथे कंपासही काम करत नाही. त्यामुळे इथे कोणी हरवलं तर तो व्यक्ती इतर लोकांना संपर्क करू शकत नाही.

GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश

आसपास राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे, की जंगलातून रात्रीच्यावेळी ओरडण्याचे आवाज येतात. साल 2003 मध्ये या जंगलातून 105 मृतदेह काढले गेले होते. यातील अनेक मृतदेह सडलेले होते तर अनेक जंगली प्राण्यांनी खाल्ले होते. असं म्हटलं जातं की मोबाईल नेटवर्क आणि कंपास काम करत नसल्याने लोक भीतीनं आत्महत्या करतात. काही जपानी लोकांचं असंही म्हणणं आहे की इथे काही मृत लोकांचे आत्मे आहेत. आपल्या भीतीदायक गोष्टींसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे.

First published:
top videos

    Tags: Japan, Suicide