मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश

GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश

एका समलिंगी जोडप्यानं 100 वर्षं जुनं (Gay couple bought 100 year old house made it beautiful) घर विकत घेऊन त्याचा जो काही कायापालट केला, ते पाहून प्रत्येकालाच कौतुक आणि आश्चर्य वाटत आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 13 नोव्हेंबर: एका समलिंगी जोडप्यानं 100 वर्षं जुनं (Gay couple bought 100 year old house made it beautiful) घर विकत घेऊन त्याचा जो काही कायापालट केला, ते पाहून प्रत्येकालाच कौतुक आणि आश्चर्य वाटत आहे. या जोडप्यानं एक जुनं घर  विकत घेतलं आणि त्याला रिनोवेट करून (Viral video of beautiful house of gay couple) सुंदर करण्याचा निर्णय़ घेतला. सुरुवातीला कठीण वाटणारी ही बाब हळूहळू आकार घेत गेली आणि बघता बघता एखाद्या महालासारखं घर तयार झालं.

दोघांनी केला कालापालट

स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या मार्क स्ट्रेचेन आणि त्याचा पार्टनर मार्क कनिंघम हे गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहतात. स्ट्रेचेन यांच्या आजोबांची एक पुरातन हवेली होती. ती त्यांना विकायची होती. आपल्या लहानपणीच्या आठवणी त्या हवेलीशी जोडलेल्या असल्यामुळे आपणच ती विकत घ्यावी, अशी कल्पना स्ट्रेचेननं मांडली आणि कनिंघमनंही त्याला होकार दिला. दोघांनी मिळून साठलेले सगळे पैसे एकत्र केले आणि हे घर खरेदी केलं.

पडकं घर ते हवेली

हे घर भलंमोठं आणि पुरातन होतं. मात्र त्याची बरीच पडझड झाली होती. या घराचं रुप पालटून आपल्या स्वप्नातल्या महालाप्रमाणं बनवण्याचा चंग या दोघांनी बांधला आणि ते तयारीला लागले. या दोघांपैकी स्ट्रेचेन हा स्वतः घरांच्या नूतनीकरणाची कामं करत होता, तर कनिंगम हा आर्किटेक्ट होता. दोघांनी मिळून अगोदर या घराचा प्लॅन तयार केला आणि जमेल तशी हळूहळू घरात एकेक सुधारणा करायला सुरुवात केली.

लॉकडाऊनमध्ये केला कायापालट

लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी अधिक मेहनत घेत घरासाठी जास्त वेळ दिला आणि आपल्याला हवं तसं रुप दिलं. त्यांनी घरातील जुन्या भिंती पाडून टाकल्या आणि त्याऐवजी कमी बेडरुम असलेलं नवं घर तयार केलं. बेडरूमचा आकार वाढल्यामुळे घर अधिकच अलिशान दिसू लागलं आणि ते नवंकोरं असल्यामुळे त्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली. या घराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. त्याला सध्या नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

First published:

Tags: Britain, Couple, Home-decor