Home /News /viral /

VIDEO : लग्नात स्टेजवरच आपसात भिडले नवरी-नवरदेव; पाहुण्यांनाही समजेना हसावं की रडावं

VIDEO : लग्नात स्टेजवरच आपसात भिडले नवरी-नवरदेव; पाहुण्यांनाही समजेना हसावं की रडावं

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नसमारंभादरम्यान वरमाळेवरुन नवरी आणि नवरदेव आपसात भिडले. आधी वरमाळा कोण घालणार यावरुन या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली

    नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) नवरदेव आणि नवरीचे अनेक व्हिडिओ (Bride and Groom Videos) व्हायरल होताना पाहायला मिळतात. लग्नातील व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंतीही मिळते. यातील काही व्हिडिओमध्ये लग्नातील मस्ती, नवरी-नवरदेवाचा डान्स (Bride Groom Dance) आणि विनोदी घटना पाहायला मिळतात. तर काही व्हिडिओ अगदी हैराण करणारे असतात. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडिओ (Funny Wedding Video Viral) समोर आला आहे. Bungee Jumping करताना दोरी तुटल्यानं महिलेचा मृत्यू, Shocking Video सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर पोहोचतात. मात्र, स्टेजवरच असं काही घडतं, जे पाहून सगळेच हैराण होतात. व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवरच आपसात भिडतात. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नसमारंभादरम्यान वरमाळेवरुन नवरी आणि नवरदेव आपसात भिडले. आधी वरमाळा कोण घालणार यावरुन या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली, मात्र यात दोघंही यशस्वी झाले नाहीत आणि दोन्ही वरमाळा तुटून खाली पडल्या. हे दृश्य पाहून लग्नात उपस्थित सगळेच लोक हसू लागले. मात्र, नवरदेवाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, त्याला ही गोष्ट अजिबातही आवडली नसल्याचं जाणवतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल होत आहे. कुत्र्याने पूर्ण केला मुलाचा Home Work; अत्यंत सुंदर Video सोशल मीडियावर व्हायरल सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. व्हिडिओला आतापर्यंत 171K व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीत हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, आतापासूनच ही अवस्था आहे, तर लग्नानंतर यांचं काय होणार. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Wedding video

    पुढील बातम्या