Home /News /viral /

लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाचं विचित्र कृत्य; संतापलेल्या नवरीनं लगावली कानशिलात, VIDEO VIRAL

लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाचं विचित्र कृत्य; संतापलेल्या नवरीनं लगावली कानशिलात, VIDEO VIRAL

लोक आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लग्नाचे व्हिडिओ (Wedding Video) पाहाताना दिसतात. त्यामुळे, असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.

    नवी दिल्ली 26 जून : कोरोना (Coronavirus) काळात लग्नसमारंभातील पाहुण्यांच्या उपस्थितीबाबतही अनेक नवे नियम (Coronavirus wedding rules) आहेत. अशात खूपच कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे पार पडतात. त्यामुळे, लोक आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लग्नाचे व्हिडिओ (Wedding Video) पाहाताना दिसतात. त्यामुळे, असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. भारतात लग्न म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणं केलं जातं. लग्नात सर्वात खास वेळ असते ती वरमाळेची. जेव्हा नवरीबाई (Bride) आणि नवरदेव (Groom) एकमेकांना वरमाळा घालतात. यादरम्यान अनेकदा अशा घटना घडतात, ज्या नंतर खूप गोड किंवा नको वाटणाऱ्या आठवणींच्या स्वरुपात कायम स्मरणात राहातात. कुठे आहे महिला सुरक्षा? भररस्त्यात महिलेला चपलेने मारहाण; VIDEO करीत राहिले बघे सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की वरमाळेदरम्यान एक नातेवाईक नवरीबाईला नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालण्यासाठी उचलून घेतो. यानंतर नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालते खरी पण खाली उतरताच ती आपल्या नातेवाईकाच्या गालात जोरात चापट मारते. ढुसकी सोडणारा नवरा नको गं बाई!; Matrimonial ad मध्ये तरुणीने ठेवली विचित्र अट हा थ्रोबॅक व्हिडिओ 2018 मधील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की संतापलेली नवरी स्टेजवरच नातेवाईकाच्या कानशिलात लगावते. वरमाळेवेळी नवरदेवाचा एक नातेवाईक नवरदेवाला उचलून वर घेतो. यानंतर नवरीकडचा एक नातेवाईकही स्टेजवर येतो आणि नवरीला उचलून घेतो. वरमाळा घालताच नवरीबाई रागात खाली उतरते. यानंतर ती मागे वळून या व्यक्तीला जोरात कानशिलात लगावते. नवरीबाईला इतका राग नेमका कशाचा आला, याबाबत सांगणं कठीण आहे. आपल्या डोळ्यांसमोर हे नेमकं काय घडतंय याचा अंदाजच बराच वेळ नवरदेवाला येत नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Video viral

    पुढील बातम्या