मुंबई, 25 जून : वर (Groom) किंवा वधू (Bride) शोधण्यासाठी जाहिरात (Matrimonial ad) हे काही नवं नाही. या जाहिरातींमध्ये संबंधित तरुण-तरुणीची माहिती दिली जाते आणि त्यात त्यांना नेमका कसा जोडीदार हवा, ते सांगितलं जातं. सुंदर, स्वयंपाक येणारी, घर सांभाळणारी, शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी जोडीदार म्हणून हवी अशा अपेक्षा तरुणांना असतात, तर जास्त शिकलेला, चांगली नोकरी असलेला, स्वतःचं घर असलेला, एकुलता एक आणि हँडसम मुलगा हवा… अशा अपेक्षा बहुतेक तरुणींची आपल्या भावी जोडीदाराबाबत असतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral) अशीच एक लग्नाची जाहिरात व्हायरल (Matrimonial ad viral post) होते आहे. ज्यातील अट तर सर्वांच्या कल्पने पलीकडे आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या एका विचित्र जाहिरातीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. एका वृत्तपत्रात ही लग्नाची जाहिरात देण्यात आली आहे. एका तरुणीला आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. पण तिच्या मागण्या आणि त्यातही तिची अट पाहूनच सर्वजण चक्रावले आहेत.
Did someone put out a matrimonial ad for me pic.twitter.com/DKsbk0iijT
— Aditi Mittal (@awryaditi) June 15, 2021
या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाच्या जाहिरातीला सर्कल केलं आहे. ज्या तरुणीसाठी वर शोधला जातो आहे, तिची ओळख सुरुवातीला या जाहिरातीत दिली आहे. तिचे केस शॉर्ट आहेत. शरीरावर तिनं piercings केलं आहे. ती स्त्रीवादी विचारसरणीची आहे. ती 30+ आहे. हे वाचा - अरे बापरे! मृत बायकोच्या मोबाईल नंबरवरून आला मेसेज; पाहूनच हडबडला नवरा पुढे मुलीला नेमका कसा वर हवा आहे. मुलीच्या मागणीनुसार तिला असा मुलगा हवा जो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक असेल. त्याच्याजवळ एक बंगला किंवा किमान 20 एकर फार्म हाऊस असावं. त्याचं वय 28 ते 30 असावं त्याला जेवणही बनवता यायला हवं. जाहिरात इथंच संपली नाही. पिक्चर अभी बाकी आहे. या सर्व झाल्या मुलीच्या मागण्या पण तिची अट तर वाचा. जाहिरातीच्या शेवटी या मुलीने आपल्याला नेमका कसा वर नको, ते सांगितलं आहे. No farterz, burpers plz असं या जाहिरातीत म्हटलं आहे. म्हणजेच तिला ढुसकी सोडणारा आणि ढेकर देणारा नवरा नको आहे. हे वाचा - पप्पी दे म्हणत पठ्ठ्याने रस्त्यावरच मांडला ठाण; तरुणीने काय केलं ते तुम्हीच पाहा हे पाहून तर तुम्हालाही हसू आवरलं नसेल. जो कोणी ही जाहिरात वाचतो आहे, त्याची अशीच प्रतिक्रिया येत आहे. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.