जोधपूर, 25 जून : ज्या देशात महिला सुरक्षेबाबत मोठ मोठे दावे केले जातात, त्यात देशात आज एका महिलेला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पुरुष अत्यंत बेजबाबदारपणे एक महिलेला चपलेने मारत आहे. सुरुवातील या पुरुषाने महिलेच्या कानशिलात लगावली, त्यानंतर चिडलेली महिला पुरुषाला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. दुचाकीवरुन आलेल्या या महिलेच्या एका हातात हेल्मेट आहे. ती हेल्मेट घेऊनच खाली उतरली. त्यानंतर कॉलनीतील तैनात गार्डसोबत वाद सुरू झाला. व्हिडीओमधील दृश्य एका कॉलनीतील गेट समोरील असल्याचं दिसून येत आहे. (woman was allegedly slapped ) पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला. आणि याची चर्चा सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ बुधवारी सकाळचा आहे. कॉलनीच्या गार्डने महिलेला एका तरुणासोबत कॉलनीत येण्यास रोखलं होतं. तेव्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला. दुसरीकडे मुंख्यमंत्र्यांच्या गृह नगरमध्ये महिलेसोबत मारहाणीची घटना घडत असल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओमध्ये महिलेच्या सुरक्षेबाबत सोशल मीडियावर सवाल उपस्थित केले जात आहे. हे ही वाचा- VIDEO : रेल्वे ट्रॅकवर उभी होती बस; समोरून भरधाव वेगानं आली ट्रेन आणि…
दुसरं दुर्देवं म्हणजे महिलेला वाचविण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. दोघांमध्ये मारहाण सुरू असताना कॉलनीतील कोणी व्यक्ती पुढे आली नाही. इतकच नाही तर जी व्यक्ती मोबाइलने हा सर्व प्रकार शूट करीत होती, ती देखील पुढे आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तंत्रज्ञानाने माणसाला संवेदनहीन केले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.