जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भडकलेल्या पक्षांनी घेतला बदला; चोचीने हल्ला करत फोडले सापाचे डोळे, कधीही पाहिला नसेल असा VIDEO

भडकलेल्या पक्षांनी घेतला बदला; चोचीने हल्ला करत फोडले सापाचे डोळे, कधीही पाहिला नसेल असा VIDEO

भडकलेल्या पक्षांनी घेतला बदला; चोचीने हल्ला करत फोडले सापाचे डोळे, कधीही पाहिला नसेल असा VIDEO

पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी सापाने खाल्ल्याच्या घटना तुम्ही ऐकली असतील आणि त्याचे व्हिडिओही पाहिले असतील, पण आज तुम्ही संतप्त पक्ष्यांचा निर्दयी सूडही बघू शकता

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जून : जंगलाचा नियम असा आहे की जो बलवान आहे तोच इथे राज्य करतो आणि जो कमजोर आहे त्याला आपला जीव गमवावा लागतो. प्रत्येक प्राणी त्याच्या अन्नसाखळीतील काही लहान प्राण्यांसाठी धोका असतो. मात्र, कधी-कधी हे छोटे प्राणी एकत्र आले तर मोठ्या प्राण्याचीही अवस्था बिकट करतात. एकत्र येऊन सिंहाला मगर आणि तरसही हरवू शकतात तर सापासाठीही पक्षांची थवा जीवघेणा ठरू शकतो. बापरे! व्यक्तीने हाताने उचलले डझनभर साप; पुढे काय घडलं पाहा, थरकाप उडवणारा VIDEO आज आम्ही तुम्हाला जंगलातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ दाखवणार आहोत. ही घटना Latest Sighting नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केली गेली आहे. प्रिटोरियातील डायनोकेंग गेम रिझर्व्हमध्ये हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे. पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी सापाने खाल्ल्याच्या घटना तुम्ही ऐकली असतील आणि त्याचे व्हिडिओही पाहिले असतील, पण आज तुम्ही संतप्त पक्ष्यांचा निर्दयी सूडही बघू शकता (Angry Birds Attack on Snake).

व्हिडिओमध्ये अनेक पक्षी एका सापाच्या भोवती उभा असल्याचं दिसतं. पक्षांनी सापाला चारही बाजूंनी घेरलं आहे आणि आलटून-पालटून हल्ला करत आहेत (Birds took Revenge). त्यांचा हल्ला इतका जबर आहे की सापाला सावरण्याची संधी मिळत नाही. तो पक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु यात यशस्वी ठरत नाही. सापावर चोचीने हल्ला करुन पक्षांनी त्याला जखमी केलं आहे. हा व्हिडिओ 37 वर्षीय पर्यावरण सल्लागार कीथ रेनी आणि त्यांची पत्नी ट्रेसी यांनी शूट केला आहे. Latest Sighting सोबत बोलताना त्यांनी सांगितलं की सापाचं वय कमी होतं आणि या हल्ल्यात त्याचे दोन्ही डोळे गेले. VIDEO - पिंजऱ्याजवळ येताच चिम्पांझीने व्यक्तीला खेचलं आणि…; प्राणीसंग्रहालयातील खतरनाक दृश्य कॅमेऱ्यात कैद सहसा, गरुड आणि मोठे पक्षी अशा प्रकारे सापांवर हल्ला करताना दिसतात, परंतु छोट्या पक्ष्यांच्या कळपानं असं करणं असामान्य होतं. याच कारणामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि 2.4 मिलियन म्हणजेच 24 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 18 हजार लोकांनी लाईक देखील केला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. बहुतेक लोकांनी कमेंटमध्ये लिहिलं की त्यांनी पक्ष्यांनी घेतलेला असा बदला पाहिला नाही, तर काही लोकांनी सांगितलं की साप आणि कावळ्यांची अशी लढाई आफ्रिकेत सामान्य आहे. या दरम्यान ते खूप आवाज करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात