जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! व्यक्तीने हाताने उचलले डझनभर साप; पुढे काय घडलं पाहा, थरकाप उडवणारा VIDEO

बापरे! व्यक्तीने हाताने उचलले डझनभर साप; पुढे काय घडलं पाहा, थरकाप उडवणारा VIDEO

बापरे! व्यक्तीने हाताने उचलले डझनभर साप; पुढे काय घडलं पाहा, थरकाप उडवणारा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डझनभरापेक्षा जास्त साप हातामध्ये घेऊन उभा असल्याचं पाहायला मिळतं (Man Held Herd of Snakes).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जून : माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण काही प्राणी असे असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवण्याआधी माणसाला 10 वेळा विचार करावा लागतो. अशाच धोकादायक आणि विषारी प्राण्यांपैकी एक म्हणजे साप. सापाला हात लावणं तर दूरच, हा प्राणी जवळ दिसला तरीही कोणाचाही थरकाप उडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डझनभरापेक्षा जास्त साप हातामध्ये घेऊन उभा असल्याचं पाहायला मिळतं (Man Held Herd of Snakes). तलावात अंघोळ करताना हंसाने केला भयंकर हल्ला; बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला VIDEO ज्यांना सापांची भीती वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ (Shocking Snake Video) एखाद्या भयानक स्वप्नासारखा आहे. यात एक-दोन नाही तर शेकडो साप दिसत आहेत. मात्र हे साप हातात घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाहीये. उलट ते या धोकादायक सापांना इकडून तिकडे अशाप्रकारे उचलून ठेवत आहेत, जणू त्यांच्या हातात साप नाही तर भाजीपाला आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समोर आलेलं नाही, मात्र कोणत्यातरी जंगलात तो शूट केला गेला आहे. याठिकाणी काही लोकांनी थर्माकोलच्या बॉक्समध्ये साप भरून आणलेले आहेत. हे लोक अगदी सहज सापांना आपल्या हाताने उचलून जंगलात सोडत आहे, हा व्हिडिओ पाहून तुमचाही नक्कीच थरकाप उडेल. मात्र या लोकांच्या चेहऱ्यावर अजिबातही भीती दिसत नाही. यादरम्यान, त्यांनी आपल्या हातात काहीही घातलेलं नाही, ते उघड्या हातांनीच सर्व काम करत आहेत. पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर naturelife_ok नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 8.9 दशलक्ष म्हणजेच 89 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून शेकडो लोकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी म्हटलं की हे लोक पिझ्झा बॉक्स उचलल्यासारखं अगदी आरामात सापांना उचलत आहेत. तर एकाने हे साप अगदी नूडल्ससारखे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात