जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - पिंजऱ्याजवळ येताच चिम्पांझीने व्यक्तीला खेचलं आणि...; प्राणीसंग्रहालयातील खतरनाक दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - पिंजऱ्याजवळ येताच चिम्पांझीने व्यक्तीला खेचलं आणि...; प्राणीसंग्रहालयातील खतरनाक दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - पिंजऱ्याजवळ येताच चिम्पांझीने व्यक्तीला खेचलं आणि...; प्राणीसंग्रहालयातील खतरनाक दृश्य कॅमेऱ्यात कैद

प्राणीसंग्रहायलात चिम्पांझीने व्यक्तीवर केला खतरनाक हल्ला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 जून : चिम्पांझी शरीराने अवाढव्य असला तरी तो तितकाच क्युटही वाटतो. चिम्पांझीशी संबंधित बऱ्याच फिल्म्स, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात सामान्यपणे चिम्पांझी माणसांना हानी पोहोचवताना दिसत नाही. चिम्पांझी आणि माणसातील प्रेम दिसून येतं. पण हे चिम्पांझीही काही वेळा खतरनाक ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येतो (Chimpanzee Attacked On Man At Zoo). एका प्राणीसंग्रहायलातील हा धक्कादायक व्हिडीओ आहे. एका संतप्त चिम्पांझीने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. पिंजऱ्यात असतानाही चिम्पांझीने व्यक्तीची अशी अवस्था केली आहे, ही पाहूनच धडकी भरेल. ही व्यक्ती तर यापुढे प्राणीसंग्रहायलात जाण्याची हिंमत करणारच नाही आणि गेली तरी चिम्पांझीसमोर तर कधीच जाणार नाही. हे वाचा -  पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक चिम्पांझी पिंजऱ्यात आहे. एक व्यक्ती त्याच्यासमोर आपले दोन्ही हात दाखवत येतो. चिम्पांझी अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो. त्याचा टी-शर्ट धरून त्याला खेचतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावते. व्यक्तीला मागून पकडून धरून खेचण्याचा प्रयत्न करते. पण चिम्पांझी त्या व्यक्तीवरील आपली पकड आणखी घट्ट करतो. टी-शर्ट हातातून सुटताच चिम्पांझी त्याचा पाय आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतो.

जाहिरात

व्यक्ती त्या चिम्पांझीच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. दुसरी व्यक्ती त्याला खेचूनही ती त्या चिम्पांझीच्या तावडीतून सुटत नाही. पिंजऱ्यावर ती व्यक्ती आडवीही होते. पण काहीच फायदा होत नाही. @gieddee इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून धडकी तर भरतेच पण हसूही आवरत नाही. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात