मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फ्राईड चिकनचा असा प्रकार पाहून डोकं गरगरेल, VIDEO पाहून नॉनवेज प्रेमीही हैराण

फ्राईड चिकनचा असा प्रकार पाहून डोकं गरगरेल, VIDEO पाहून नॉनवेज प्रेमीही हैराण

VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

  • Published by:  Meenal Gangurde

Viral Video: व्हायरल होणाऱ्या एका विचित्र व्हिडीओमध्ये (Viral Video On Social Media) एक स्थानीय स्ट्रीट फूड विक्रेता गरम गरम तेलात हात घालून चिकन फ्राय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ @nonvegfoodie नावाच्या पेजवरुन इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. येथे एक व्यक्ती गरम तेलात हात घालून चिकन बाहेर काढताना दिसत आहे. चिकनचे तुकडे बाहेर काढल्यानंतर तो चिकनला एका कंटेनरमध्ये ठेवतो आणि त्यावर विविध मसाले भूरभूरतो. (Nonveg lovers will also be shocked to see this type of fried chicken)

उकळत्या तेलात हात घालून काढलं फ्राइड चिकन..

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, यांच्या हाताला चटका बसत नाही का? उकळत्या तेलात हात घालून काढलं फ्राइड चिकन. अली चिकन सेंटर.' फूड ब्लॉगरदेखील हा कारनामा पाहून हैराण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 59000 हून अधिक लाइक्स आले आहेत. या व्हिडीओच्या खाली नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर लिहिलं आहे की, कोण आहे हा लोहपुरुष? तर दुसऱ्याने लिहिलं आहे रिअर लाइफ आयरन मॅन.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली हायजिनची चिंता..

काही नेटकऱ्यांनी हायजिनची चिंता व्यक्त केली आहे. यातून अस्वच्छता वाढते. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने यामागील ट्रिक शेअर केली आहे. त्याचं म्हणणं आहे की, या व्यक्तीने आधी आपले हात पाण्याने ओले केले, आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात हात घातला. त्यामुळे त्याला चटका लागला नाही.

First published:

Tags: Shocking viral video