मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बांधकाम मजुरानं दाखवला आपल्या जबरदस्त डान्सचा जलवा; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

बांधकाम मजुरानं दाखवला आपल्या जबरदस्त डान्सचा जलवा; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा मुलगा कन्सट्रक्शन साईटवर मजूरी करत आहे. मात्र, अचानक त्याच्यातील डान्सर जागा होतो आणि तो एखाद्या प्रोफेशनल डान्सरप्रमाणे डान्स करू लागतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) आजकाल लहान मुलांचे व्हिडिओही चांगलेच व्हायरल होतात. छत्तीसगडच्या सहदेवचं गाणंही पाहता पाहता तुफान व्हायरल (Viral Song) झालं आणि त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली. आता तो सेलिब्रिटी बनला आहे. अशातच आता एका कामगाराचा एक डान्स व्हिडिओ (Dance Video of Worker) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

माकडांसमोर तरुणाने लगावले ठुमके आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

या व्हिडिओची खास बाब म्हणजे, ज्याने कोणी हा व्हिडिओ पाहिला तो या मुलाची तुलना मायकल जॅक्सनसोबत करू लागला. काही लोकांनी असंही म्हटलं, की या व्यक्तीसमोर तर गॉड ऑफ डान्सही फेल आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा मुलगा कन्सट्रक्शन साईटवर मजूरी करत आहे. मात्र, अचानक त्याच्यातील डान्सर जागा होतो आणि तो एखाद्या प्रोफेशनल डान्सरप्रमाणे डान्स करू लागतो. डान्स करताना त्याने हात आणि पाय यांचा ताळमेळ अतिशय सुरेख पद्धतीनं राखला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून समजतं की तो आपल्या डान्समध्ये पूर्णपणे मग्न झाला आहे.

या कामगाराचा डान्स व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, याच्या टॅलेंटला पुढे पोहोचण्याची गरज आहे. दुसऱ्यानं लिहिलं, देव या मुलाला योग्य रस्त्यावर घेऊन जावो. तर, .हेआणखी एकानं लिहिलं, या डान्सरने डान्स करताना जे हावभाव दिले त्यानं मन जिंकलं. मी हा व्हिडिओ वारंवार पाहत आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या टोपीवर डोळा; मुलाने भर कार्यक्रमातच काय केलं पाहा VIDEO

हा व्हिडिओ official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत लिहिलं गेलं, की यालाही संधी मिळायला हवी. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

First published:

Tags: Dance video, Video Viral On Social Media