व्हॅटिकन सिटी, 22 ऑक्टोबर : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही वेळा आपल्याला एखादी वस्तू हवीच म्हणून ते हट्टाने पेटतात आणि घरातच नव्हे तर घराबाहेर कुठेही ठाण धरून बसतात, मोठमोठ्याने रडतात, धिंगाणा घालतात. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्याला चक्क पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची टोपी (Pope Francis cap) हवी होती आणि त्यासाठी त्याने जे केलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही (Pope Francis-Boy viral video). पोप फ्रान्सिस आणि एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक लहान मुलगा पोप फ्रान्सिस यांची टोपी मिळवण्यासाठी काय काय करताना दिसतो आहे. सुरुवातीला तो टोपी खेचतो आणि टोपी काढण्याचाही प्रयत्न करतो (Boy snatch Pope’s cap). बुधवारी व्हॅटिकन सिटीमध्ये (Vatican City) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बरेच लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पोप फ्रान्सिस स्टेजवर बसले होते. त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या सुरक्षेसाठी काही लोक बसलेले होते. तेव्हा अचानक एक मुलगा स्टेजवर आला. हा मुलगा पोप यांच्या शेजारीच फिरत होता. पण पोप यांनी त्याला दूर केलं नाही. खूप प्रेमाने त्याच्यासोबत ते वागत होते. शिवाय पोप फ्रान्सिस यांच्या शेजारी त्यांच्या सुरक्षेसाठी बसलेल्या एका व्यक्तीने या मुलाला आपल्या जागेवर बसायलाही दिलं. हे वाचा - चिमुकल्या लेकीच्या खतरनाक हौशेमुळे आई दहशतीत; तिची खेळणी पाहूनही फुटतो घाम व्हिडीओत पाहू शकता मुलगा स्टेजवर खेळताना दिसतो आहे. इथं तिथं फिरतो आहे. महत्त्वाचं म्हणजे तो वारंवार पोप यांच्या टोपीला हात लावताना दिसतो आहे. पोप यांची टोपी काढण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला पोप फ्रान्सिस यांची टोपी इतकी आवडली की त्याला ती टोपी हवी होती. हे सर्वांच्या लक्षात आल्यावर त्या मुलासाठीही पोप फ्रान्सिस यांच्यासारखी एक टोपी मागवण्यात आली. ती टोपी त्याच्या हातात देताच तो आपल्या डोक्यावर घालतो आणि आनंदाने तिथून निघून जातो.
A boy stole the show at Pope Francis' general audience at the Vatican. The boy, who the pope later said had a medical ‘limitation,’ walked on and off the stage freely, returning to the center several times as the pope continued his address pic.twitter.com/uUQHdgRir5
— Reuters (@Reuters) October 20, 2021
पोप यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, हा मुलगा मानिसकरित्या अस्थितर आहे. मुलाने जे केलं ते देवाने त्याच्याकडून करवून घेतलं आहे आणि त्याने आपल्या चांगल्या हृदयाने ते केलं. हा मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो. हे वाचा - कधी कंगना, तर कधी दयाबेन! या 9 वर्षाच्या मुलीनं अभिनायतून केली कमाल ख्रिश्चन धर्मात रोम कॅथलिक चर्चमधील सर्वात मोठ्या धर्मगुरूंना पोप म्हटलं जातं. ख्रिश्चनांचं सर्वात पवित्र शहर वॅटेकनचे राज्याध्यक्ष पोप असतात. सध्या पोप फ्रान्सिसच्या पदावर आसीन आहेत. पोप बेनेडिक्ट XVI यांच्या राजीनाम्यानंतर 2003 साली ते पोप बनले होते. जॉर्ज मारियो बर्गोग्लियो हे त्यांचं खरं नाव आहे, ते अर्जेंटिनात राहणारे आहेत.