मराठी बातम्या /बातम्या /Viral /

माकडांसमोर तरुणाने लगावले ठुमके आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

माकडांसमोर तरुणाने लगावले ठुमके आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

तरुणाला माकडांनी घेरलं आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा.

तरुणाला माकडांनी घेरलं आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा.

तरुणाला माकडांनी घेरलं आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा.

  मुंबई, 22 ऑक्टोबर : माकड (Monkey) दिसताच त्यांच्यासोबत फोटो काढायला उत्सुक असणारे बरेच लोक तुम्ही पाहिले असतील पण माकडांसमोर (Monkey video) कधी कोणत्या माणसाला नाचताना पाहिलं आहे का  (Monkey dance)? सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्याने चक्क माकडांसमोर डान्स केला आहे (Man dance in front of monkey). हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की पाहून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही. माकड किती त्रास देतात हे कुणाला सांगायला नको. कदाचित तुमच्या घराजवळ कधीतरी माकड आलं असावं किंवा तुम्ही फिरायला गेल्यावर माकडांचा अनुभव नक्कीच घेतला असाल. या तरुणासोबतही तसंच काहीसं झालं. एका ठिकाणी त्याला माकडांनी घेरलं. त्यानंतर हा तरुण तिथून घाबरून पळाला नाही तर त्याने चक्क डान्स केला.
  माकडांसमोर तरुणाने ठुमके लगावले, त्याने असा डान्स केला की माकडही त्याला पाहतच राहिले. तरुणाचा डान्स पाहून माकडही हैराण झाले. हे वाचा - OMG! चाकूने तुकडे करून खाल्ला साप; VIDEO पाहूनच नेटिझन्सचा उडाला थरकाप व्हिडीओत पाहू शकता तरुण माकडांसमोर कसा डान्स करतो आहे. माकड त्याच्या आजूबाजूला बसले आहेत आणि तरुण त्यांच्यासमोर ठुमके लगावतो आहे. विचित्र पद्धतीने डान्स करतो आहे. त्याचा डान्स पाहून आपल्याला हसू तर येतंच, पण ज्यांच्यासमोर तो डान्स करतो आहे त्या माकडांनाही त्याचं आश्चर्य वाटतं. माकडही त्याच्यापासून दूर पळू लागतात. हे वाचा - VIDEO - तुडवून, आपटून पाण्यातच मारून टाकलं, पिल्लांसाठी आईची मगरीशी थरारक झुंज animals_lover_wasim__77 इन्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तो पाहून पाहून त्यावर तशाच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेक युझर्सनी या तरुणाची तुलना शोलेतील बसंतीशी केली आहे. कुणी त्याला बंदर की बसंती म्हटलं, तर कुणी बसंता नाच रहा है असं म्हटलं. एकाने माकडांना नेमकं काय वाटलं असावं ते सांगितलं आहे. डान्स पाहून माकडही कन्फ्युझ झाले अशी कमेंट या युझरने केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या