मुंबई, 11 मे : कुठेही फिरायला गेलो की सर्वात महत्वाचं असतं ते हॉटोल. चांगल्या लोकेशनसह चांगल्या सोयीचं हॉटेल मिळालं. तर लोकांचा वेकेशनचा आनंद दुप्पट होतं. यासाठी लोक ऑनलाईन हॉटेलचं रेटिंगस पाहातात. शिवाय बोर्डवर देखील हॉटेल ते पुरवत असलेल्या सोयीप्रमाणे 5 स्टार, 3 स्टार आणि 4 स्टार अशा रेटिंग्स देते. पण या रेटिंग्स कशा ठरवल्या जातात कधी विचार केलाय का? या रेटिंग्स कोण आणि का देतं? चला आपण सविस्तर जाणून घेऊ. भारतात 3 स्टारपेक्षा जास्त स्टार्स असलेले हॉटेल्स चांगले मानले जातात. तुम्हाला साधारणपणे 5 स्टार हॉटेल्समध्ये लक्झरी सुविधा मिळतात आणि जेव्हा हे स्टार्क कमी होऊ लागतात, तेव्हा सुविधा कमी होऊ लागतात. नवजात बालक जन्माला येताच का रडतं? तुम्हाला माहितीय याचं कारण? पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक समितीच या सर्व हॉटेल्सना रेटिंग देते. ती हॉटेल आणि रेस्टॉरंट मान्यता आणि वर्गीकरण समिती म्हणून ओळखली जाते. ही समिती दोन भागात काम करते, त्यापैकी एक भाग थ्री स्टार हॉटेलला रेटिंग देतो आणि दुसरा भाग 5 स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याचे काम करतो. भारतातील हॉटेल्सच्या रेटिंगसाठी अनेक पॅरामीटर्स सेट केले आहेत. जेव्हा हॉटेल रेटिंगसाठी अर्ज करते, तेव्हा ही समिती त्यांना भेट देते. यामध्ये पब्लिक एरिया, लॉबी, रेस्टॉरंट, बार, शॉपिंग, कॉन्फरन्स हॉल, रूम, बाथरुमचा आकार आणि एसीचा तपशील पाहिला जातो.
याशिवाय दिव्यांगांसाठी विशेष सेवा, बिझनेस सेंटर, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल, पार्किंगची तपासणी समितीमार्फत केली जाते. तपासणीदरम्यान अग्निशमन उपाययोजना आणि सुरक्षेचीही काळजी घेतली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की हॉटेल्सना 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार आणि 5 स्टार डीलक्सचे रेटिंग दिले जाते. याशिवाय हेरिटेज ग्रँड, हेरिटेज क्लासिक, हेरिटेज बेसिक अशी हेरिटेज श्रेणीही आहे.