मुंबई, 18 नोव्हेंबर : तुम्हाला मासे खायला आवडत असतील किंवा खायला नाही पण पाळायला आवडत असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या माशांबाबत नक्कीच माहिती असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशा माशाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो आजवर तुम्ही कधीच पाहिला नसेल. किंबहुना या माशाला पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या माशाला डोकं किंवा जबडाच नाही आणि तो चक्क जिवंत आहे. या विचित्र माशाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामान्यपणे मासे पाण्यात राहतात. त्यांना पाण्याबाहेर काढलं तर काही वेळ ते तडफडतात आणि त्यांचा मृत्यू होतं. माशांचं डोकं कापला की ते जिवंत राहत नाही हे तुम्हीही पाहिलं असेल. पण या व्हिडीओतील माशाने मात्र सर्वांना शॉक दिला आहे. कारण त्याचं डोकं नाही पण तरी तो जिवंत आहे आणि पाण्यात पोहोतोही आहे. हे वाचा - आपल्याच पिलांना खातात सिक्लिड मासे, माशांमधल्या या विचित्र वर्तनाबाबत शास्त्रज्ञांचं संशोधन व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पाण्यात एक मासा पोहोताना दिसतो आहे. पण त्याचं डोकं नाही आहे. डोकं कापल्यासारखं आहे. पण डोकं नसलं तरी तो अगदी सहजरित्या पाण्यात पोहोतना दिसतो आहे. किनाऱ्यावर आल्यावर या माशाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती त्या माशाच्या पाठीला बोट लावते तसा हा मासा मागे हटतो. @OTerrifying ट्विटर अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने असाच आपला अनुभवही सांगितलं आहे. त्याने मासा पकडल्यानंतर त्याचं डोकं कापलं. आता हा मासा मृत होईल असं त्याला वाटलं पण तो मासा जिवंतच होता. तर एका युझरने हा अगांथा मासा असल्याची माहिती दिली आहे. या माशाला जबडा नसतो. त्यामुळे आपल्या तोंडाने ते खाणं गिळतात. काहींनी हा तो मासा नसल्याचं म्हटलं आहे.
Fish swimming with no head 😳 pic.twitter.com/QxVIOT39OT
— OddIy Terrifying (@OTerrifying) November 17, 2022
तुम्हाला या माशाला पाहून काय वाटलं किंवा तुम्हाला या माशाबाबत काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.