गाझियाबाद 7 सप्टेंबर : सोशल मीडियावरील काही व्हिडीओ हे खूपच धक्कादायक असतात. एक असाच धक्कादाय व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर ट्रेंड होऊ लागला आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही अनेक पाळीव कुत्रे पाहिले असतील. हे कुत्रे तसे पाहाता खूप शांत स्वभावाचे असतात. तसेच कुत्र्याला एक मनमिळावू आणि प्रेमळ प्राणी म्हणून ओळखले जाते. परंतू गाझियाबादमध्ये एका पाळीव कुत्र्याने असं काही केलं आहे, जे पाहून तुम्हाला कुत्र्यांची भीतीच वाटू लागेल.
गाझियाबादमधील एका सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ लिफ्टमधील आहे, ज्यामध्ये एक पाळीव कुत्रा लहान मुलाला चावला.
रिपोर्टनुसार, ही घटना राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या 'चार्म्स कॅसल सोसायटी'ची आहे. जिथे लिफ्टमध्ये एक मूल जात होता. दरम्यान, एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये शिरली. त्यानंतर कुत्र्यापासून अंतर राखत हा लहान मुलगा लिफ्टच्या दरवाजाकडे हळूच सरकला, परंतू तेव्हाच कुत्र्याने त्याचा चावा घेतला.
हे वाचा : नाचण्यात दंग असणाऱ्या काकूंनी चिमुकल्याला पाहिलंच नाही, अचानक मागे आल्या आणि... पाहा Video
आश्चर्याची गोष्ट अशी की ही महिला जी कुत्र्याची मालकीन आहे. ती अशी काही वागत होती की, जसे काही तिच्या कुत्र्याने काही केलेच नाही. हा लहान मुलगा वेदनेनं ओरडंत होता. परंतू या महिलेला त्याचं काहीच नाही. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स खूप संतापले आहेत.
ही संपूर्ण घटना कशी घडली?
ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास 'चार्म्स कॅसल सोसायटी'च्या लिफ्टमध्ये घडली. 9 वर्षीय तरुण ट्यूशनमधून घेऊन जात होता. हा मुलगा एकटाच होता, त्याच्यासोबत त्याच्य घरचं कोणीच नव्हतं. ट्यूशनमधून तो परतला तेव्हा त्याने लिफ्ट पकडली. दरम्यान, एक महिला आपल्या पाळीव प्राण्यासोबत लिफ्टमध्ये आली. तेव्हाच याकुत्र्याने त्या मुलाच्या मांडीला चावा घेतला.
हा मुलगा वेदनेनं ओरडू लागला, पण ती स्त्री त्याच्य वेदनेकडे दुर्लक्ष करत, आपल्या जागेवर शांतपणे उभी राहिली आणी आपला मजला मजला येताच ती लिफ्टमधून निघून जाते. लिफ्टमधून उतरताना देखील हा कुत्रा त्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हा ही महिला त्या कुत्र्याला घट्ट धरुन ठेवते.
हे वाचा : अरे काय राव हे काय पोरगं आहे! राइडवर बसलेल्या या चिमुकल्याचा VIDEO पाहून व्हाल हैराण
ज्यानंतर या मुलाने आपल्या घरी घडलेलं सगळं प्रकरण सांगितलं, ज्यानंतर या मुलाच्या आईने नंदग्राम पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 289 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आई म्हणाली- जेव्हा मी मजल्यावर उभी होते तेव्हा मुलगा आला आणि मला संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी त्याच्या आईने खाली जाऊन त्या महिलेला गाठले आणि तिला नाव आणि फ्लॅटनंबर विचारला. परंतू या महिलेनं काहीही सांगितलं नाही.
Very shameful act from this lady from Charms Castle Society, Ghaziabad. Her pet dog bit the child in the lift but she ignored the pain the child. The child kept crying.@amritabhinder @ShefVaidya @SwatiJaiHind @TajinderBagga @sonalgoelias @megirish2001 @arunbothra @TandonRaveena pic.twitter.com/r2wis31jjM
— Rajan Rai (@RajanRa05092776) September 6, 2022
नंतर सिक्युरिटी गार्डकडून या मुलाच्या आईने त्या महिलेची माहिती मिळवली, जी त्याच सोसायटीच्या B-506 फ्लॅटमध्ये राहते.
पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी पाळीव कुत्र्यांना लिफ्टमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे!
या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला ज्यानंतर युजर्समध्ये नाराजी पसरली आहे. कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. एका यूजरने लिहिले की, महिला मुलाच्या जवळही गेली नाही. कोणी इतकं क्रूर कसं असू शकतं. स्वतः कोणाची तरी आई होणारी स्त्री एवढ्या लहान मुलाला दुःखात सोडून निघून गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Shocking video viral, Top trending, Viral videos